‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री स्वानंदी टिकेकर घराघरांत पोहोचली. अभिनेत्रीने ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये ‘मीनल’ नावाचे पात्र साकारले होते. स्वानंदी अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी आहे. तिने मनोरंजन क्षेत्र कसे आणि का निवडले? , आई-वडिलांची यात तिला कशी साथ मिळाली याविषयी स्वानंदीने सुरेखा तळवलकरांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात खुलासा केला आहे.

हेही वाचा : Ajmer 92 : “तरुणींचे अपहरण, बलात्कार अन्…”, ३१ वर्षांपूर्वी २५० मुलींबरोबर काय घडलं? ‘अजमेर ९२’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

indrayani marathi serial
‘इंद्रायणी’ मालिकेत छोटी इंदू ‘त्या’ धक्कादायक सीनसाठी ‘अशी’ झाली तयार; पाहा पडद्यामागील रिअल हिरोचा व्हिडीओ
Bigg Boss marathi fame Dhananjay Powar met Ankita Walawalkar boyfriend kunal baghat
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार अंकिता…
Reshma Shinde
“माझ्या माणसांचा हात धरून…”, रेश्मा शिंदेने शेअर केली खास पोस्ट; चाहत्यांनी नवऱ्याबद्दल विचारले प्रश्न
Marathi Actress Hemal Ingle Bachelor Party
बॅचलर पार्टीसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीने गाठलं थायलंड! नुकतंच ‘या’ सुपरहिट चित्रपटात केलंय काम, तुम्ही ओळखलंत का?
abhishek gaonkar marathi actor and sonalee gurav famous reel star mehendi ceremony
आली लग्नघटिका समीप! ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा पार पडला मेहंदी सोहळा; होणाऱ्या बायकोने शेअर केले फोटो

स्वानंदी म्हणाली, “शाळेत मी प्रचंड हुशार होते. अभ्यासात नेहमी चांगले मार्क्स आणि शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने अभिनय क्षेत्र निवडले पाहिजे याची जाणीव मला फार उशिरा झाली. अभिनय करायचा असे मी केव्हाच ठरवले नव्हते. कॉलेजमध्ये असताना मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. रात्रभर नाटकाचा सराव करून मी सकाळी ७ वाजता पहिल्या लेक्चर जायचे. यात माझ्या सगळ्या शिक्षकांनी मला सहकार्य केले.”

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर वंदना गुप्ते दिसणार नव्या भूमिकेत; अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाल्या…

कॉलेजमधील शिक्षकांविषयीचा अनुभव सांगत स्वानंदी म्हणाली, “आमच्या कॉलेजने तेव्हा मानाचे पुरुषोत्त्म करंडक जिंकले होते आणि आमचा बक्षीस समारंभाचा प्रयोग होता. बक्षीस समारंभाच्या प्रयोगाला सगळ्यांचे सामान एकत्र असते. त्यावेळी माझी बॅग एका दुसऱ्या कॉलेजच्या ट्रकमधून कोणीतरी चुकून घेऊन गेले. नाटकात मी आठ महिन्याच्या गरोदर बाईची भूमिका साकारत असल्याने माझे सगळे सामान त्या बॅगेत होते. आता अचानक नवीन सामान कुठून आणायचे असा प्रश्न मला पडला. अर्ध्या तासात प्रयोग सुरु होणार होता… शेवटी साडी, कृत्रिम पोट वगैरे लावायला मी माझ्या मित्रमंडळींची मदत घेतली आणि तयार झाले.”

हेही वाचा : “‘गदर’च्या सेटवर सलग ३० तास काम केले” अमीषा पटेलचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “दिग्दर्शक अनिल शर्मांचे…”

“संपूर्ण तयारी झाल्यावर मला लक्षात आले की, माझ्याकडे गळ्यात मंगळसूत्र नव्हते. आता मंगळसूत्र कुठून आणू? असा विचार करत असताना माझे लक्ष प्रेक्षकांमध्ये बसलेल्या माझ्या कॉलेजच्या एका मॅमकडे गेले. मी त्यांच्याकडे मंगळसूत्र मागितले त्या बाईने एका संकेदाचा विलंब न करता…काय झालं? कसली अडचण आहे का? असे बोलून पटकन मला गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. तो बक्षीस समारंभाचा प्रयोग अप्रतिम झाला आणि मध्यरात्री मला माझी बॅग परत मिळाली. या सगळ्या माणसांमुळे माझे आयुष्य घडले.” असे स्वानंदीने सांगितले.