‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे अभिनेत्री स्वानंदी टिकेकर प्रसिद्धीझोतात आली. गेल्यावर्षी ‘झी मराठी’वरील ‘अगंबाई सुनबाई’ मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारली होती. स्वानंदी ही प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. अलीकडेच स्वानंदीने सुरेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबाबत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “ताई, साडीतच राहा…”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते नाराज

स्वानंदी म्हणाली, “सुरुवातीच्या काळात माझे संपूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर असायचे. मला अभिनय करायला आवडतोय याची कल्पना नव्हती. मी अभिनय केव्हाच शिकले नाही, मात्र आयुष्यात आलेल्या अनुभवातून मी शिकत गेले.”

हेही वाचा : ओटीटीवरील आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेटवर निर्बंध येणार? मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली महत्त्वाची बैठक

स्वानंदी पुढे म्हणाली, “मला कधीच वाटले नव्हते की, आपण अभिनय करू शकतो. मी पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जायची तयारी केली होती. न्यूयॉर्क विद्यापीठात माझी प्रवेश प्रकिया पूर्ण झाली. व्हिसा वगैरे सगळी कामे पूर्ण होती. त्याच काळात मी ‘प्राईजटॅग’ नावाचे नाटक करत होते. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माझे बाहेरगावी जायचे निश्चित झाले होते. याचदरम्यान मला प्राईजटॅग नाटकासाठी ‘झी गौरव’चा पुरस्कार मिळाला.”

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बॅगेत आढळला गांजा, पोलिसांकडून अटक; सुटकेसाठी मोजावी लागली मोठी किंमत

“माझ्या आई-बाबांनी या सगळ्या गोष्टी पाहून सांगितले, हे बघ आम्ही सुद्धा एक कलाकार आहोत. अभिनय करून आम्ही आनंद मिळवला आणि लोकांना तो आनंद दिला. तुझ्याकडे सुद्धा हा पर्याय उपलब्ध आहे भविष्यात तिकडे गेल्यावर तुला वाटले आपण अभिनय करायला हवा होता का तर काय करायचं? या गोष्टींचा विचार कर… यानंतर खूप विचार केल्यावर मी पुढे चांगली नोकरी, शिक्षण आणि पैसे कमावण्याची संधी सोडून अभिनय क्षेत्रात संघर्ष करण्याचा मार्ग निवडला.”, असे स्वानंदीने सांगितले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress swanandi tikekar talks about her filmy career and education sva 00
Show comments