बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चन हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. अभिषेक बच्चनचा घूमर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यानिमित्ताने पहिल्यांदाच अभिषेक बच्चनने ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये हजेरी लावली. यावेळी अभिषेक बच्चनने प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवलचे कौतुक केले. त्यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार म्हणून तुषार देवलला ओळखले जातो. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच त्याने अभिषेक बच्चनबरोबर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबर त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?

“जेव्हा अभिषेक बच्चन विचारतो .”ये आप live music करते हो?”मी म्हणतो हो.Ab म्हणतो कैसे? …… मी म्हणतो मेरे पास Que लिखे होते है..Ab म्हणतो ooohhhh फिर भी?…..तेव्हाच भरून पावलो…..bollywood मधला एक अभिनेता एवढ्या कौतुकाने विचारतो. आपल्या कामाची दखल घेतो …. फारच कमाल …”, असे तुषार देवल म्हणाला.

तुषार देवलच्या या पोस्टवर त्याची पत्नी स्वाती देवलनेही कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. “तू खरंच ग्रेट आहेस तुषार. यामुळेच तर मी तुझ्याशी लग्न केले. तुझं तबला वाजवणं, संगीताबद्दलची जाण, उत्स्फूर्तपणा आणि प्रेम पाहून तर प्रेमात पडले होते”, अशी कमेंट स्वातीने केली आहे.

आणखी वाचा : “लक्ष्मीकांत गेल्यानंतर नाईलाज म्हणून मुलांना…”, प्रिया बेर्डेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या “माझ्या सासरची मंडळी…”

दरम्यान तुषार देवलची पत्नी स्वाती एक अभिनेत्री आहे. ती झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकली होती. तिने कलाविश्वामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कुंकू’, ‘कळत नकळत’, ‘पारिजात’, ‘वादळवाट’, ‘विवाहबंधन’, ‘फु बाई फु’, ‘पुढचं पाऊल’ यांसह अनेक मालिकांमध्ये ती झळकली.

झी मराठीवर रंजक वळणावर सुरू असलेली ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपी कमी असल्याने चॅनलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. तर त्या जागी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. नुकताच या नवीन मालिकेचा प्रोमो समोर आला. ही गोष्ट दोन सख्ख्या बहिणींची आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress swati deval comment on tushar deval abhishek bachchan photos social media nrp
Show comments