सध्या देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या नऊ दिवसात भाविक तल्लीन होऊन देवीची पूजाअर्चा करत आहेत. आज अष्टमी आहे. यादिवशी दुर्गामातेचे आठवे रुप म्हणजे महागौरीची पूजा केली जाते. त्यामुळे सध्या अष्टमीच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहे. एका मराठमोळ्या अभिनेत्रीने अष्टमीच्या शुभेच्छा चाहत्यांना अनोख्या अंदाजात दिल्या आहेत. या अभिनेत्रीने अंगात ताप असूनही देवीच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मीनाक्षी वहिनी म्हणजे अभिनेत्री स्वाती देवलने अष्टमी अनोख्या अंदाज शुभेच्छा दिल्या आहेत. तिने देवीच्या गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे की, अष्टमीच्या शुभेच्छा …. सर्दी, खोकला, ताप..पण देवीचा उदो उदो केला की संचारतच…
हेही वाचा – “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…
हेही वाचा – “राज ठाकरे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, त्यांचं नाही” अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं वक्तव्य
स्वाती देवलचा हा जबरदस्त डान्स पाहून चाहते कौतुक करत आहेत. “काय एनर्जी आहे…मला खूप आवडलं”, “रॉकेट परफॉर्मन्स स्वातीजी..देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहू दे अशी प्रार्थना”, “भारी”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी स्वातीच्या डान्स व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, स्वातीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘सोनी मराठी’वरील ‘राणी मी होणार’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. स्वाती ही प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार तुषार देवल याची पत्नी आहे. तुषार हा गेल्या कित्येक वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात दिसत आहे.