छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार हे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून स्वाती देवलला ओळखले जाते. नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. स्वातीच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती तुषारने एक खास पोस्ट केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वाती देवलचा पतीचे नाव तुषार देवल असे आहे. तो ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार म्हणून काम करतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काही फोटो एकत्र करत व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

तुषार देवलची पोस्ट

“आज तुझा वाढदिवस….. काय बोलू? खरतर बोलायला खूप काही आहे पण तुझ्या विषय…….., सुमारे 23 वर्षापासून एकमेकांना ओळखतो, पण तुझा प्रत्येक वाढदिवस स्पेशल कसा करता येईल याचाच विचार करत असतो आणि माझ्या परीने तो स्पेशल करण्याचा प्रयत्न ही करतो. या फोटोमधला प्रत्येक क्षण मी तुझ्या बरोबर जगलोय. कायम स्वच्छंदी हसतमुख कधी रागीट कधी लहान मुल कधी मैत्रीण कधी बायको कधी आई अश्या अनेक भूमिका आपल्या संसारात मी तुला सच्चेपणाने वठवताना बघितलं आहे. आणि तुझ्या याच स्वभावामुळे अजून तुझ्या प्रेमात पडतो….असच राहायला मला ही शिकव. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. लव्ह यू डार्लिंग”, असे तुषारने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ने मोडला बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, कमाई पाहून केदार शिंदे म्हणाले, “तब्बल २१ वर्ष…”

दरम्यान अभिनेत्री स्वाती देवलने कलाविश्वामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘कुंकू’, ‘कळत नकळत’, ‘पारिजात’, ‘वादळवाट’, ‘विवाहबंधन’, ‘फु बाई फु’, ‘पुढचं पाऊल’ यांसह अनेक मालिकांमध्ये ती झळकली.

विशेष म्हणजे केवळ मराठीच नाही तर स्वातीने हिंदी मालिकांमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तर तुषार देवल याचीही लोकप्रियता तितकीच आहे. कधी एखाद्या प्रसंगाला योग्य संगीत देत, तर कधी आगरी भाषेमध्ये हटके बोलत तो प्रेक्षकांची मन जिंकतो.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress swati deval husband tushar deval birthday post reveled lovestory nrp
Show comments