तेजश्री प्रधान मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक मालिका, चित्रपट माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेतील तेजश्री आणि शशांक केतकरच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ऑनस्क्रीनबरोबर खऱ्या आयुष्यातही दोघांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. पण, काही काळातच दोघे वेगळे झाले. आता घटस्फोटाच्या नऊ वर्षांनंतर तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हेही वाचा- “मी आणि पप्या भेटलो की…”; सुप्रिया पाठारेंनी शेअर केला ‘दगडू’बरोबरचा खास फोटो, म्हणाल्या…
शशांकबरोबर घटस्फोट झाल्यानंतर तेजश्रीने करिअरवर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. मध्यंतरीच्या पडत्या कळानंतर तेजश्रीने मनोरंजन क्षेत्रात पुन्हा कमबॅक केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढंच नाही, तर नवऱ्यामध्ये कोणते गुण हवेत याबाबतचा खुलासाही तेजश्रीने केला आहे.
हेही वाचा- “तुझं लग्न कधी आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी म्हणाली, “पत्रिका…”
तेजश्री म्हणाली, “एखाद्याच्या आयुष्यात चढउतार येतात तेव्हा आपण कोलमोडतो, थांबतो, ब्रेक घेतो. मी शेवटी स्वत:ला समजावलं की नीट राहायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की, मी करिअरकडे जास्त लक्ष देते. अनेक जणांकडून मी माझ्याबाबत अशा पद्धतीची वाक्यही ऐकली आहेत.”
लग्नाबाबत बोलताना तेजश्री म्हणाली, “लग्नासाठी मला फार स्थळं येत नाहीत. मला कुटुंब आवडतं. मला कुटुंब हवं आहे. मला लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की, वयाच्या २४-२५ व्या वर्षी मी तो निर्णय घेतला. पण, मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचं आहे. त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत, माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे. कारण मला बोलायला आवडतं. मी पार्टी करणारी मुलगी नाही, मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो.
‘होणार सून मी या घरची’ मालिकेच्या सेटवर तेजश्री आणि शशांक केतकरची पहिली भेट झाली. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ८ फेब्रुवारी २०१४ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. पण, दोघांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर शशांकने २०१७ मध्ये प्रियांका ढवळेबरोबर लग्नगाठ बांधली, तर तेजश्री अद्याप सिंगल आहे.