‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान बऱ्याच काळ अभिनय क्षेत्रापासून दूर होती. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेनंतर ती कुठल्याही मालिकेत झळकली नाही. पण, ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असायची. आता तेजश्रीने चाहत्यांसाठी एक खुशखबर दिली आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर प्रसारित होणार असून याबाबत अजून अधिकची माहिती देण्यात आलेली नाही. नुकताच तेजश्रीने या संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
ananya pandey marriage plans
अनन्या पांडे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? अभिनेत्री लग्नाचे प्लॅन्स शेअर करत म्हणाली, “पुढील पाच वर्षांत…”
Punha Kartvya Aahe
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत होणार नवीन एन्ट्री; ‘या’ जेष्ठ अभिनेत्री दिसणार गुरूमाँच्या भूमिकेत
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओत तेजश्री म्हणतेय की, “आपली मराठी परंपरा मराठी प्रवाह… येस, बरोबर ओळखलंत. मी येतेय आपल्या स्टार प्रवाहच्या नव्याकोऱ्या मालिकेतून खास तुमच्या भेटीसाठी… आता मालिकेचं नाव, तारीख, वेळ ही सगळी उत्सुकता पूर्ण होणार आहे, आमच्या नव्याकोऱ्या प्रोमोमधून. पण त्यासाठी तुम्ही बघत राहा, आपलं स्टार प्रवाह.”

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील सुनील बर्वे दिसणार आता ‘या’ भूमिकेत; म्हणाले, “स्ट्रगलचा उपयोग होतोय आता….”

तेजश्रीच्या या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि प्रतिक्रियेच्या माध्यमातून भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, “तेजश्री नेहमी वेगवेगळे विषय हाताळत असते, बघूया यावेळी कोणतं नवीन कथानक आहे?” तर दुसऱ्या चाहतीनं लिहिलं आहे की, “आम्ही याचीच तर वाट बघत होतो.” तसेच तिसऱ्या चाहतीनं लिहिलं आहे की, “लवकर ये ताई, मी आणि माझे कुटुंब तुझी वाट बघतं आहोत.”

हेही वाचा – “स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल तोंडातून ब्र न काढणारे…”, मराठी अभिनेत्याने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, “OTT वरील काल्पनिक…”

हेही वाचा – “पाल, सरडा, साप यांना मी हाताने उचलू शकते पण….” अभिनेत्री जुई गडकरीला वाटते ‘याची’ भीती, म्हणाली “जवळ आलं तरी…”

दरम्यान, या नव्याकोऱ्या मालिकेत तेजश्री प्रधानबरोबर अभिनेत्री शुभांगी गोखले ही झळकणार आहे. त्यांचाही प्रोमो व्हिडीओ स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे आता तेजश्रीच्या चाहत्यांमध्ये या मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता ही मालिका कधी, केव्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे येत्या काळात समजेल.

Story img Loader