Tejashri Pradhan mother passed away : ‘प्रेमाची गोष्ट’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. तेजश्रीच्या आईचं १६ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तिची आई आजारी होती, आजारपणात त्यांचं निधन झाल्याचं कळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेजश्री प्रधानच्या कोणत्याही कार्यक्रमात तिची आई तिच्याबरोबर असायची. आईला आपल्या लेकीचं काम खूप आवडायचं. त्या अनेकदा तेजश्रीच्या कामाचं कौतुक करायच्या. दोन महिन्यांपूर्वी तेजश्रीच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचं स्पेशल स्क्रीनिंग झालं होतं. यावेळी तेजश्रीचे आई-बाबाही आले होते. त्यावेळी तिची आई म्हणाली होती, “आतापर्यंत तिने विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तिची ‘अग्गबाई सासूबाईमधली तिची भूमिका फार आवडली. माझं असं नेहमी म्हणणं असतं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, सहन करत राहू नये. ती तिची भूमिका तशी होती. तर या मालिकेतही पुढे तशीच होताना दिसेल. आम्ही तिचं काम पाहिलं आहे आणि आवडलं आहे.”

तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एका सक्षम महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. यात तिच्याबरोबर अभिनेता राज हंसनाळे व अपूर्वा नेमळेकर प्रमुख भूमिका साकारत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress tejashri pradhan mother passed away hrc