‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सुंदर अभिनय यामुळे तेजश्री कायमच चर्चेत असते. तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत जान्हवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे आजही तिचे कौतुक केले जाते. नुकतंच तेजश्रीने एक पोस्ट शेअर केली. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच तेजश्रीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत.
आणखी वाचा : “माझ्या कोणत्याही निर्णयावर मी खंत…”, तेजश्री प्रधानची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तेजश्रीने शेअर केलेल्या या फोटोत ती एकटक पाहताना दिसत आहे. तिने नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. यात ती स्मित हास्य करताना दिसत आहे. तिचा हा फोटो फारच सुंदर दिसत आहे.

“तुला तुझ्या स्वत:बद्दल अभिमान असायला हवा, कारण तू तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ एकट्याने घालवला आहेस. ज्यावेळी इतर सर्वांना तू ठिक आहेस, असं वाटतं होतं”, असे कॅप्शन तेजश्रीने दिले आहे.

आणखी वाचा : “आम्हाला एकमेकांचं तोंड…” शिव ठाकरेने सांगितलं वीणा जगतापशी ब्रेकअप करण्यामागचं खरं कारण 

तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत काय झालंय, असं विचारलं आहे. “काय झाले इतके उदास व्हायला, इतक्या उदास होऊ नका, मॅडम तुम्ही, तुम्ही इतक्या छान ॲक्ट्रेस आहात, मी बऱ्याच मालिका आणि शो पाहिले आहेत तुमचे. नेहमी आनंदात राहा”, असा सल्ला एका नेटकऱ्याने दिला आहे.

दरम्यान आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तेजश्री प्रधान हिने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती. 

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress tejashri pradhan share emotional post on instagram caption viral nrp