मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सुंदर अभिनय यामुळे तेजश्री कायमच चर्चेत असते. नुकतंच तेजश्रीने सुखी जीवनाचा मंत्र शेअर केला. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.
तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच तेजश्रीने इन्स्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहेत.
आणखी वाचा : Video : अनुष्का शर्माबरोबर नाचता नाचता विराट कोहलीला झाली दुखापत, पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
“प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला सुधारण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाचा आनंद घ्या, सुखी जीवन”, असे कॅप्शन तेजश्री प्रधानने दिले आहे. या फोटोत ती फार गोड हसताना दिसत आहे.
दरम्यान मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तेजश्री प्रधान हिने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकाही चांगलीच गाजली होती. तसेच तिने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत जान्हवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे आजही तिचे कौतुक केले जाते.