अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या सहजसुंदर अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहेत, तितकाच तिचा परखड मतांचा चाहता वर्ग आहे. तेजश्री कोणत्याही मुद्द्यावर खुलेपणाने बोलते. नुकताच तेजश्रीने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिला घटस्फोटाबाबतचं मत आणि घटस्फोटानंतर ती सगळ्यांना समोर कशी गेलीली? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तेजश्रीने खूप सुंदर उत्तर दिलं.

तेजश्री प्रधान म्हणाली, “तुमच्या आयुष्यात अशा परिस्थिती येणार असतात. तेव्हा तुमचं दैवत तुम्हाला ती ताकद देतं. तुमच्यात ती ताकद आपसुक येते. जेव्हा तुम्हाला वाटतं, हे काहीतरी चुकतंय. तेव्हा ती ताकद येते आणि तुम्ही ते करून मोकळे होता. आज मी विचार केल्यानंतर त्या गोष्टी मला कठीण वाटतात. मला असं वाटतं, ती ताकद त्या परिस्थितीला येणारी असते. ती ताकद येते आणि मग तिची गरज संपली तेव्हा कमी होऊन जाते, मला हा अशातला भाग वाटतो.”

shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Uday Samant on chhava movie
Chhava Movie Controversy : अखेर छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…
marathi actor abhijeet shwetchandra and his wife announces pregnancy
“बेबी श्वेतचंद्र Coming…”, लोकप्रिय मराठी अभिनेता होणार बाबा, चाहत्यांना ‘अशी’ सांगितली गुडन्यूज, व्हिडीओने वेधलं लक्ष
Saif attacker tag costs Colaba resident his job, marriage
Saif Attacker Tag : “लग्न मोडलं, नोकरीही गेली..”, सैफवर हल्ला करणारा संशयित या एका आरोपाने कसं बदललं तरुणाचं आयुष्य?
Air India passengers create ruckus after got stranded in Mumbai-Dubai flight
Air Indiaच्या विमानात ५ तास अडकून पडले प्रवासी, खाली उतरवण्यासाठी घातला गोंधळ; व्हायरल होतोय Video
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

पुढे तेजश्री प्रधान म्हणाली की, बाकी दोन चांगली माणसं प्रत्येकवेळी चांगले आयुष्यभराचे जोडीदार असतील, असं काही गरजेचं नाहीये. त्यामुळे सगळ्यांत आधी मी जी गोष्ट माझ्याबाबतीत केली होती, आज ती कॉमन झालीये. मला सांगायला आवडेल की, तुम्ही इतर व्यक्तींचा सन्मान करा. तरीपण माझ्या आयुष्यात जे घडलंय त्यासाठी मला त्याला दोष द्यायचा नाही. यात मला काही देवी बनायचं आहे, असं नाही. साधी माणूस म्हणून सांगतेय, ज्या व्यक्तीने मला दुखावलं किंवा तो व्यक्ती माझ्यामुळे दुखावला आहे. तर मला असं वाटतंय, त्या दोन माणसांमध्ये आपण त्या माणसाला विशेष अधिकार द्यायचा नाही. आपल्या आयुष्यातील एवढी मोठी गोष्ट त्याच्यामुळे झालीये. जे काही झालंय ते माझ्या नशीबात होतं, ते होणार होतं आणि त्याच्यासाठी मी दुसऱ्याला दोष देऊन त्या माणसाला मोठं करतेय. आज माझ्या आयुष्यात जे होतं, त्यासाठी मी समोरच्याला का जबाबदार धरू? माझं आयुष्य माझं आहे, ते खूप मौल्यवान आहे. जे घडतंय ते माझ्या इच्छेने, माझ्या धाडसाने घडतंय. कारण त्यावेळेस तो योग्य निर्णय घेण्यासाठी ते धाडसं लागतं. हे प्रत्येकाला जमतं असं नाहीये. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेता ती सोपी गोष्ट नसते.

“तो निर्णय घेतल्यानंतर लोकांनी जज करणं, तुमच्याबद्दल मत निर्माण करणं. मला माहीत नाही, लांबून बसून यांच्या घरी कोण लोकं पोसत असतात? पण, मी नेहमी ऐकते आम्ही बाबा असं ऐकलं. परंतु, हे कोणाकडून ऐकतात आणि हे ज्यांच्याकडून ऐकतात त्यांनी आपल्या घरात सीक्रेट कॅमेरा वगैरे लावून गेले होते का? पण, भाई ऐकतात, असं काही घडल्यानंतर घडलेल्या गोष्टींपेक्षा या ऐकलेल्या असतात ना, हे जे आपले स्वतःला घोषित केलेले शेजारी असतात. आम्हाला माहितीये ना, आम्ही ऐकलंय ना, आम्ही शेजारीच होतो, मी तिकडेच होतो, या अ‍ॅटिट्यूटची माणसं असतात ती विशेष असतात. पण, मला असं वाटतं, सगळ्यात आधी आपण स्वतःला माफ करायचं. अशी एखादी परिस्थिती आल्यानंतर सकाळी उठल्यावर मी स्वतःला अगोदर सांगते, आज मी आयुष्यात थोडं वाईट वागते, असं म्हणून आपण वागतो का? नाही वागतं,” असं तेजश्री प्रधान म्हणाली.

त्यानंतर तेजश्री म्हणाली, “दुसरी गोष्ट जेव्हा आपण जे निर्णय ज्या क्षणाला घेतले असतात ना, त्यावेळी ते आपल्याला आपल्यासाठी अत्यंत योग्य वाटलेले निर्णय असतात. त्यामुळे समजूतदारपणाने आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा विचार केला की मग आपण समोरच्याच्या आयुष्याची वाट लावायचा विचार केला होता का? तर नव्हता केला. तसंच पुढे जाऊन हे होणार होतं ते झालं. आणि आपण माणूस म्हणून जन्म घेतलाय, हे महत्त्वाचं आहे. काही कर्तव्ये असतात, काही गोष्टी ज्यासाठी आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. नाहीतर आपल्याला थेट मोक्ष मिळालं असतं. जो माणूस जन्माला आलाय त्याच्या तो प्रवास आहे. त्याच्या हा भाग ठरलेला होता, हे असं होणार होतं, हे घडणार होतं. पण दुर्दैव एवढंच आहे, आपल्या समाजाला खूप वेळ आहे. अरे, मला माहितीये ना, हे असंच झालं असणार. अरे, पण ते तसं नाहीये.”

“एखाद्याच्या आयुष्यात काही वाईट घटना घडतेय ती वाईटच गोष्ट असते आणि ती दोन्ही कुटुंबासाठी वाईट असते. त्यामुळे तुम्ही ना त्याच्यात शिरू नका. तुमच्या घरात हे झाल्यानंतर आम्ही त्याच्यात येतो का? आज फक्त आम्ही कलाकार आहोत म्हणून. आम्ही एखादं प्रोजेक्ट सोडलं की आमच्या आयुष्यात काही घडलं तर तुम्हाला एक संधी मिळते येऊन बोलायला, का बरं असं केलंत तुम्ही? अरे पण तुमच्या मुलाने आता चांगली संधी मिळतेय म्हणून त्याने सध्याची नोकरी सोडली तर आम्ही येऊन तुमच्या घरी विचारतो का, का बरं त्याने आधीची नोकरी सोडली? तर नाही ना. या गोष्टी विधी लिखित असतात, त्या होतं असतात. त्याच्यावर आपला ताबा नसतो,” असं तेजश्री प्रधान म्हणाली.

Story img Loader