अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ती ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. तसंच काही दिवसांपूर्वी तिने प्रशांत दामले यांचं ‘शिकायला गेलो एक’ नाटकाचा आस्वाद घेतला. या नाटकातील कलाकारांचं भरभरून कौतुक करताना तेजश्री दिसली होती. आतादेखील अभिनेत्री निर्सगाच्या साधिन्यात रमली आहे. याचा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने प्रेम, नातं, घटस्फोट, सोशल मीडिया याविषयी परखड मतं मांडली. यादरम्यान, तिची एक परीक्षा घेतली. तिला काही शब्द सांगितले. त्या शब्दावरून पहिल्यांदा काय आठवत हे तेजश्रीला सांगायचं होतं. रिमा अमरापूरकर यांनी तेजश्रीची ही मुलाखत घेतली आहे.
रिमा यांनी तेजश्रीला पहिला शब्द ‘प्रेम’ सांगितला. यावर तेजश्री म्हणाली, “आता मालिका सोडलीये. तर मालिका आणि त्यामधला रोमान्स.” त्यानंतर ‘अभ्यास’, ‘शाळा’ हे शब्द सांगितले. तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “अभ्यास जो मी केला नाही.” शाळेविषयी म्हणाली की, मला काही नाही आठवत आहे. कारण खूप आठवणी आहेत. त्यामुळे एका शब्दात नाही सांगू शकत.
मग तेजश्रीला चौथा शब्द ‘मैत्री’ सांगण्यात आला. यावर तेजश्री म्हणाली की, याबाबतीत मी खूप नशीबवान आहे. माझ्याकडे खूप जास्त मित्र-मैत्रीणी आहेत. पुढे ‘आवडता पदार्थ’ विचारला. तेव्हा तेजश्री म्हणाली, “मला खाण्यातलं सगळं आवडतं. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही मला खायला खूप आवडतं. मला आता सुद्धा कुठेतरी पाणीपुरी खायची म्हणालीस. तरीही ती मला तेवढीच आवडते.” नंतर ‘चहा की कॉफी’ असं विचारलं. याविषयी तेजश्री म्हणाली की, यापैकी काहीच नाही. आपल्या इंटस्ट्रीत माझ्या आजूबाजूने आजूबाजूच्या लोकांकडे चहा-कॉफी फिरत असते. पण एखादी कीक मिळण्यासाठी पुस्तकं वाचते. पुढे तिला ‘सध्या काय वाचतेस?’ असं विचारलं. तेजश्री म्हणाली, “सध्या मी खूप वेगळं पुस्तक वाचतेय. त्याबद्दल मला सांगायला आवडणार नाही.”
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानने प्राजक्ता माळीच्या पावलावर पाऊल ठेवलं. प्राजक्ता माळीचे गुरु श्री श्री रविशंकर आहेत, जे आता सर्वश्रुत आहे. याच श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात तेजश्री काही दिवस वास्तव्यास होती. याच आश्रमातील तिने बरेच फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते.