अभिनेत्री तेजश्री प्रधानची काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट घेतली. त्यामुळे ती सध्या ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. नुकताच तिने ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिने सोशल मीडियाबाबतीत आपलं मत मांडलं.
तेजश्री प्रधान म्हणाले, “सोशल मीडिया हे चांगलं माध्यम आहे. नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या, वाईट बाजू असतातच. पण, मला वाटतं आपण त्याच्या चांगल्या गोष्टींकडे अधिक जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण आपल्या प्रगतीचा विचार करतो. कोणीच स्वतःच्या आयुष्यात वाईट करुया, असा विचार करत नसतो. त्यामुळे आपल्याला त्या माध्यमाचा कसा छान पद्धतीने फायदा घेता येईल, याचा विचार केला पाहिजे. फक्त हे मृगजळासारखं आहे. त्यामुळे जास्त त्यात वाहून गेलं नाही पाहिजे.”
पुढे तेजश्री प्रधान म्हणाली, “आजच्या तरुणपिढीला विशेषतः हे सांगायचं आहे, यात चांगल्या गोष्टी आहे, ज्यामुळे तुमची ओळख निर्माण होते. तुमच्या फॉलोअर्सवरून काम मिळतात. त्यामुळे आमच्या कलाकारांचीदेखील फॉलोअर्सवरून किंमत ठरते. कलाकारांसाठी आता हे सीव्हीतले मुद्दे झाले आहेत. पण ठीक आहे. सुरुवातीला पेपरमधल्या एका जाहिरातीमधून नाटक, चित्रपटाची जाहिरात यायची. आता सोशल मीडियासारखं माध्यम आहे.”
त्यानंतर तेजश्री म्हणाली की, मला आजकालच्या तरुणपिढीला सांगायचं आहे, सोशल मीडियावर आयुष्यात कोणीही माणूस दुःखी असताना किंवा रडत असताना किंवा यश न प्राप्त झाल्यानंतर काहीतरी शेअर करून असं फोटो टाकत नसतं. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, ते सोशल मीडिया आपण उघडतो आणि स्क्रॉल करता स्पीड कमी होतं जातो. मग कळतं आपल्याला जड होतं चाललंय. कारण सोशल मीडियावर सर्व परफेक्ट दिसतं. त्यामुळे सतत स्वतःच्या आयुष्याची इतरांशी तुलना केली जाते. याचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं सुरू आहे. तर तसं नसतं. हे डिस्प्रेशन कारण बनवायला नाही पाहिजे.
सोशल मीडियावरून आपलं आयुष्य वाईट आहे आणि दुसऱ्याचं खूप चांगलं चाललंय, हे विचार करणं तरुणांनी कमी केलं पाहिजे. सोशल मीडियाच्या वाईट गोष्टींमधला हा मुद्दा मला सर्वात मोठा वाटतो. याला फॉलोअर्स जास्त आहेत. याला फॉलोअर्स कमी आहेत, ठीक आहे. प्रत्येक दिवसाला सोशल मीडियावर टाकायला मला कंटेन्ट हवाय, त्यावरून आपण आयुष्यात किती आनंदी आहोत, हे ठरवणं चुकीचं आहे. हे इतरांनी ठरवावं, असं तेजश्री प्रधान म्हणाली.