Tejashri Pradhan: काही महिन्यांपूर्वी तेजश्री प्रधानने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ला रामराम केला. तेव्हापासून तेजश्री ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर काही दिवसांनी तिने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या आश्रमातील तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तेजश्री हिमाचल प्रदेशची सफर करत आहे. याचे फोटो, व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधान हिमाचल प्रदेशमध्ये फिरत आहे. हिमाचल प्रदेशमधील हिरव्यागार निर्सगाचा आनंद घेताना दिसत आहे. तसंच फोटो, व्हिडीओमध्ये ती हिमाचलच्या टेकड्यांची सफर करतानाही पाहायला मिळत आहे. तेजश्रीसह तिची खास मैत्रीण नमिता बांदेकर या ट्रीपमध्ये दिसत आहे. नमितानेदेखील तेजश्रीबरोबरचे बरेच फोटो, व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तेजश्री व नमिता दोघींही हिमाचल प्रदेशची ही ट्रीप खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये दोघी बुरांश फुलांचा रस पिताना पाहायला मिळत आहेत. तसंच दुसऱ्या व्हिडीओमध्ये डोंगराच्या पायथ्याशी योग करताना दिसत आहेत. तेजश्री व नमिताच्या हिमाचल प्रदेशच्या ट्रीपचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/04/Tejashri-Pradhan-4.mp4
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/04/Tejashri-Pradhan-3.mp4
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/04/Tejashri-Pradhan-2.mp4
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/04/Tejashri-Pradhan.mp4

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून तेजश्री प्रधान फक्त ठिकठिकाणी फिरत नसून कामाला देखील लागली आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘छावा’ चित्रपटात झळकलेल्या शुभंकर एकबोटेबरोबर काम करताना दिसली होती. शुभंकरने सेटवरीला फोटो शेअर करून तेजश्री प्रधानला पोस्ट टॅग केली होती. अभिनेत्याने सेटवरील कॅमेराचा फोटो शेअर करत लिहिलं होतं की, “हॅलो मित्रा…आयुष्यभराचा सर्वात चांगला मित्र…” हे कॅप्शन त्याने कॅमेराला उद्देशून लिहिलं होतं. तसंच #somethingnew असंदेखील लिहिलं होतं. त्यामुळे या पोस्टमधून शुभंकर आणि तेजश्री लवकरच एकत्र झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

याशिवाय तेजश्री प्रधान अनेक कलाकारांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे. २० मार्चला तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील योगेश केळकर (पुरुषोत्तम कोळी), आयुष भिडे (लकी), कोमल सोमारे (स्वाती) व दिग्दर्शक विघ्नेश कांबळे यांना भेटली होती. हे पाचही जण खूप एन्जॉय करताना दिसले. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडली असली तरी त्या मालिकेतील काही कलाकारांबरोबरचं तेजश्रीचं नातं अजूनही घट्ट आहे.