मराठी मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत तितिक्षाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. तितिक्षा इथवरच थांबली नाही. तिने तापसी पन्नूच्या ‘शाबाश मिथू’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या नव्या मालिकेमध्ये तितिक्षा मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसत आहे. यश मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या या अभिनेत्रीने आता नवी कोरी कार खरेदी केली आहे. यादरम्यानचा व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
तितिक्षा सध्या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. आपल्या कामामधून वेळ काढत तिने दिवाळी सण उत्साहात साजरा केला. यंदाची दिवाळी तिच्यासाठी अगदी खास ठरली आहे. यामागचं कारण म्हणजे तिने स्वतःची पहिली कार खरेदी केली. ही कार खरेदी करत असताना तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
पाहा व्हिडीओ
“वेलकम किया. माझी पहिली कार.” असं तितिक्षाने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. नवी कोरी किया कार तितिक्षाने खरेदी केली. या कारची किंमत लाखोंच्या घरात आहे. पण तितिक्षाने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःसाठी गाडी खरेदी केल्याचा तिला आनंद आहे. तिने कार खरेदी करतानाचा व्हिडीओ शेअर करत याबाबत आपल्या चाहत्यांना सांगितलं.
आणखी वाचा – Photos : खऱ्या आयुष्यात प्रथमेश परबला मिळाली प्राजू? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
तितिक्षाच्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही तिची नवी कोरी कार पाहून तिचं अभिनंदन केलं आहे. तिच्या चाहत्यांनीही तिला नव्या कारसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.