अनेक मराठी अभिनेत्री आहेत ज्यांनी मनोरंजन सृष्टीला रामराम करत परदेशात स्थायिक झाल्या आहेत. एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्री सध्या त्यांचं वैयक्तिक आयुष्य परदेशात एन्जॉय करत आहेत. पण तरीही या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असतात. त्यामुळे या मराठी अभिनेत्री अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशी एक अभिनेत्री आहे, तिनं नुकतंच मोठं यश मिळवलं आहे. याबाबत तिनं सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

ही मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून उमा पेंढारकर आहे. ‘स्वामिनी’, ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘योग योगेश्वर जयशंकर’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली उमा मनोरंजन विश्वापासून दूर राहून न्यूझीलंडमध्ये राहत आहे. तिचा नवरा तिथे स्थायिक असतो. जरी उमा न्यूझीलंडला स्थायिक झाली असली तरी ती तिच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असते. युट्यूबद्वारे उमा लोकांना मानसिक स्वास्थ्य, मेकअप, स्कीनकेअर याबद्दल सल्ले देत असते. U MAtter असं अभिनेत्रीच्या युट्यूब चॅनलचं नाव असून तिच्या या युट्यूब चॅनलचे नुकतेच १ लाख सब्सक्रायबर्स झाले आहेत. त्यानिमित्तानं तिला युट्यूबकडून सिल्व्हर बटण देण्यात आलं आहे. याविषयी उमाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…

उमाने युट्यूब चॅनेलला १ लाख सब्सक्रायबर्स झाल्यानिमित्ताने सेलिब्रेशन केलं आहे. त्याचेच फोटो शेअर करत तिने लिहिल आहे, “जेव्हा मला एखादी व्यक्ती विचारायची की उमा तू युट्यूबर (YouTuber) आहेस ना? तेव्हा पटकन मनात यायचं की अजून आपलं चॅनेल एवढं मोठं झालेलं नाही की आपण स्वतःला एक युट्यूबर म्हणवून घेऊ. पण आतापासून हे उत्तर बदलणार…कारण आता १०००० लोकांचा विश्वास, त्यांचा आशीर्वाद माझ्या चॅनेलबरोबर आहे. म्हणूनच आजपासून ऑफिशियली युट्यूबर आहे असं म्हणायला काही हरकत नाही.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ : “मिसेस सायली माफ करा”, बायकोची समजूत काढण्यासाठी अर्जुनने बनवला खास प्लॅन, पाहा प्रोमो

“खरंतर गप्पा मारणे हा माझा आवडता छंद आणि त्यात मानसशास्त्र (Psychology) मध्ये मास्टर्स झाल्यामुळे वेगळा वेगळ्या विषयांवर मग ते मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य या सारख्या अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करणे ही तर फारच आवडीची गोष्ट. त्यातही एक क्लासिकल गायिका क्लासिकल नृत्य विशारद आणि अभिनेत्री असल्यामुळे मेकअप (makeup) आणि स्किनकेअर (Skincare), हेअरकेअर (haircare) हे सुद्धा अगदीच आवडीचे विषय. म्हणून २०२०ला ठरवलं की युट्यूब चॅनेल काढायचं. मग सुरुवात करायची तर चांगल्या मुहूर्तावर करूयात म्हणून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चॅनेलचा श्रीगणेशा केला. चॅनेल सुरू करायच्या आधी मी (मानसशास्त्र) psychology सेशन्स घेताना कायम म्हणायचे remember ‘You’ always always matter… आणि यातूनच चॅनेलचं नाव ठेवलं..U MAtter (You Matter) त्यात पुन्हा UMA कॅपिटलमध्ये ठेवून क्रिटीव्हिटी दाखवायचा प्रयत्न होता. पण आज हे छोटं चॅनेल एक खूप मोठा परिवार झालाय.”

“माझा स्वतःचा हक्काचा परिवार. प्रत्येक युट्यूबरचं एक स्वप्न असतं की तो चंदेरी आकडा १००००० दिसावा ज्यानंतर खुद्द युट्यूबकडून कौतुकाची थाप म्हणून सिल्व्हर प्ले बटण (silver play button) दिलं जातं. आज मी पण त्या silver button ची मानकरी झालेय. त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मेहनत करत राहिलो की सगळी स्वप्न पूर्ण होतात त्याचीच ही एक प्रचिती आहे.. हा प्रवास खूप मोठा आहे आणि आता कुठे मजेशीर भागाला सुरुवात झालेय… अजून खूप प्रवास करत पुढे जायचंय.. पण तूर्तास थोडं थांबून आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच सदैव पाठीशी असूदेत.. मनापासून खूप धन्यवाद..“श्रीराम””, असं उमा म्हणाली.

हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीचा ध्वनी प्रदूषणामुळे संताप, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माईकवरून भसाड्या आवाजात…”

दरम्यान, उमा पेंढारकरप्रमाणे लोकप्रिय मृणाल दुसानिस, नेहा गद्रे, चैत्राली गोखले अशा बऱ्याच अभिनेत्री परदेशात स्थायिक झाल्या आहेत. या अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे नेहमी वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण शेअर करत असतात.

Story img Loader