मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर गेल्या काही वर्षांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. पण तरीही ती युट्यूब आणि सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते. मंगळवारी उर्मिलाने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यामध्ये तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याबद्दलच्या प्रश्नांचाही समावेश होता. यातील एका प्रश्नाच्या उत्तरात उर्मिलाने अपयशाची भीती वाटणाऱ्यांना खूप मोलाचा सल्ला दिला आहे.
चाहत्याने उर्मिलाला प्रश्न विचारला की, “न घाबरता घरातून बाहेर कसे पाऊल ठेवावे आणि ध्येयाचा पाठलाग कसा करावा? अपयश आल्यावर काय होईल? असे खूप नकारात्मक विचार मनात येतात.” या प्रश्नाचे उत्तर देताना उर्मिला म्हणाली, “जीवनात फक्त यशस्वी व्यक्तीलाच अपयश येते. जी व्यक्ती आधीच अपयशी आहे ती कधीच अपयशी होऊ शकत नाही. मला अपयश आवडतं. त्यामुळे नवीन गोष्टी करा आणि पुन्हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. कारण अपयशी होण्यापेक्षा प्रयत्न न करणं ही सर्वात वाईट गोष्ट आहे.”
हेही वाचा – ३१ वर्षांपूर्वीच्या शाहरुख खानच्या ‘त्या’ व्हिडीओची मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले, “हेल्मेट…”
हेही वाचा – ‘खतरों के खिलाडी १३’ मधून ‘हा’ स्पर्धक बाहेर; टॉप ८ मध्ये कोणी मारली बाजी, जाणून घ्या
दरम्यान, उर्मिला ही नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला चाहत्यांना देत असते. उर्मिला तिच्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ बनवून शेअर करत असते. तसेच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते.