अभिनेत्री उर्मिला निंबाळकर जरी अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी ती नेहमी चर्चेत असते. स्वतःच्या युट्यूब चॅनलवरून ती लाइफस्टाइल, मेकअप, ट्रॅव्हल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावरूनही ती नेहमी चाहत्यांना सकारात्मक राहण्याचा सल्ला देत असते. नुकताच तिनं एका महत्त्वाच्या विषयावरील व्हिडीओ शेअर केला आहे; तो म्हणजे महिलांची सुरक्षा.

‘उर्मिला निंबाळकर’ या युट्यूब चॅनेलवर दर शुक्रवारी अभिनेत्री वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ शेअर करत असते. या शुक्रवारी तिनं महिलांच्या सुरक्षेच्या विषयावरील व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये उर्मिलाने महिलांच्या सुरक्षेसाठी १५ टिप्स दिल्या आहेत. त्या काय आहेत, जाणून घ्या.

amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
aishwarya narkar shares diwali padwa video
नारकर जोडप्याचा दिवाळी पाडवा! अविनाश यांनी बायकोला काय गिफ्ट दिलं? ऐश्वर्या व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…
wife cuts husbands private parts
दारूच्या नशेत पतीचं पत्नीशी भांडण, संतापलेल्या पत्नीनं पतीच्या गुप्तांगावर…
puri making tips
सणासुदीला टुमदार, लुसलुशीत पुरी बनवायची आहे? ‘या’ महत्त्वाच्या टिप्स करा फॉलो
Netizens Trolled Marathi actress Prajakta Mali, know
“फरसाण खायचं बंद कर”, ऑरा जपण्यासाठी प्राजक्ता माळी काय करते ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “गावात राहणारा माणूस…”
How exactly does insulin work hldc
Health Special: इन्सुलिनचं कार्य नेमकं कसं चालतं?
What Devendra Fadnavis Said About Ajit Pawar?
Devendra Fadnavis : “आर. आर. पाटील यांचं निधन झालंय, तो विषय…”; अजित पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित; नेटकरी म्हणाले, “नवीन विषय काही सुचत नाही का तुम्हाला?”

१) सदा सावध तो सदा सुखी

२) अपमानास्पदरित्या एखाद्याला नकार देऊ नका.

३) नकार देताना शक्यतो भेटू नका.

४) नकार कळवण्यासाठी भेटायचंच असेल तर सार्वजनिक ठिकाणी भेटा.

५) लिफ्टमध्ये एकच पुरुष असेल तर जाऊ नका.

६) कोणत्याही परिस्थितीत असला तरी गाडीची लिफ्ट मागू नये.

७) सोशल मीडियावरील प्रोफाइलवर अधिक विश्वास ठेऊ नका.

८) कामानिमित्ताने कोणाच्याही घरी जाऊ नका.

९) समोरच्या व्यक्तीची देहबोली समजून घ्या.

१०) तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा.

११) मेसेज, ईमेल आणि फोन रेकॉर्डिंग सेव्ह करा.

१२) तुमच्या घरातील किंवा जवळच्या व्यक्तीला बाहेर पडल्यानंतर लाईव्ह लोकेशन शेअर करा.

१३) तुमच्या बॅगेत किंवा पर्समध्ये इमरजन्सी फोन नंबर लिहून ठेवा. तसेच त्यामध्ये तुमचा रक्तगट आणि पूर्ण नावसुद्धा लिहा.

१४) कुटुंबातील व्यक्तींबरोबर किंवा मित्र-मैत्रिंणीबरोबर संवाद साधा.

१५) एकमेकांना समजून घ्या.

हेही वाचा – करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये झळकणार मराठी मालिकाविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता

या १५ टीप्स दिल्यानंतर व्हिडीओच्या शेवटी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर म्हणाली की, “सगळेच पुरुष वाईट नसतात. बरेच पुरुष खूप जन्टलमॅन असतात, खूप अप्रतिम समजून घेतात. समानतेवर विश्वास ठेवतात, पाठिंबा देतात. सगळेच भक्षक व वाईट असतात असं समजून घेऊ नका. या व्हिडीओमागचं एकच उद्दिष्ट, महिलांनी सावध राहणं ऐवढंच आहे. आपण अजिबात कुठल्याही एका लिंगाच्या विरोधात नाही.”