मागील काही दिवसांपासून बऱ्याच अभिनेत्री मनोरंजनसृष्टीत आलेल्या अनुभवाविषयी परखड बोलताना दिसत आहेत. मग हेमा मालिनी असो, राधिका आपटे असो किंवा रतन राजपूत. प्रत्येक अभिनेत्री मनोरंजनसृष्टीतील धक्कादायक अनुभवाचा खुलासा करत आहेत. नुकतंच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने फेक ऑडिशनच्या जाळ्यात ती कशाप्रकारे अडकली होती, याचा भयानक अनुभव सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरून या भयानक अनुभवाचा खुलासा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे उर्मिला निंबाळकर. नुकत्याच शेअर केलेल्या तिनं व्हिडीओमध्ये महिलांच्या सुरक्षेविषयी काही टिप्स दिल्या आहेत. याच टिप्स सांगताना तिनं तिच्याबरोबर घडलेला हा प्रसंग सांगितला. ती म्हणाली की, “मी आज माझ्या खूप खासगी गोष्टी शेअर करणार आहे. मला अजून आठवतंय मुंबईला एक प्रोडक्शन हाउस होतं. त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेले. अतिशय लेजिटीमेट पाठी वगैरे लावली होती. नोंदी केलेलं प्रोडक्शन हाउस असल्यासारखं दिसत होतं. एका मालिकेच्या ऑडिशनसाठी मी गेले होते. तिथे खूप गर्दी होती. बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांसाठी ऑडिशन सुरू होत्या. वेगवेगळ्या केबिन होत्या. मग मला तिथला निर्माता आतल्या खोलीत जाऊ या, असं म्हणाला.”

हेही वाचा – अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्या १५ टिप्स; जरूर वाचा

“त्यावेळेस मी वयाने खूप लहान होते. पण मला असं झालं, आतल्या खोलीत का जायचं आहे? बाहेर सगळी गडबड चालू होती. तरी सुद्धा मला का बरं आतल्या खोलीत बोलावलं असेल? इथे कॅमेरा आहे, इथे शूट आहे. मग माझ्याबरोबर असं काय बोलायचं आहे? त्यासाठी केबिन तर आहेच की? असे बरेच प्रश्न अंतर्मनात सुरू होते. मला काही कळलं नव्हतं. त्यानं मला गडबड करत आतल्या खोलीत जायचं आहे म्हणून घेऊन गेला. मी सुद्धा गेले. मुळात अशावेळी आपल्याला कळतंही नाही काय करायचं. तिथे गेल्यानंतर त्यानं अशा पद्धतीने सुरुवात केली की, मला तुला पर्सनली बघायचं आहे, तुला काय करता येतं. अभिनय काय करता येतो, आणखी काय काय करता येतं. त्यानंतर तो बोलता बोलता उठला. हा आता मिठ्ठी मारणार हे मला कळलं. यावेळी माझं अंतर्मन बरोबर सांगत होतं.”

हेही वाचा – करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये झळकणार मराठी मालिकाविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता

पुढे अभिनेत्री म्हणाली की, “मी जेव्हा त्या खोलीकडेच जात होती. तेव्हाच मला कळालं होतं की, काहीतरी हे भयानक आहे. तरीही मी गेले. नशीबाने खोलीचा दरवाजा उघडाचं होता. त्यामुळे मी दरवाजाच्या बाजूलाच बसले होते. मला त्या खोलीत आतमध्ये जाऊन बसावं, असंही वाटतं नव्हतं. काहीतरी वेगळं वाटतं होतं. माझं अंतर्मन मला बरोबर सांगत होतं. तो माणूस उठला आणि माझ्या जवळ येणार तितक्यात मी जोरदार तिथून पळ काढला. माझ्यावर प्रसंग येण्याच्या आत मी माझी बॅग उचलली. आता इथे माझं काहीही राहील तरी चालेल हा विचार करून मी तिथून पळाले. सातवा किंवा आठवा मजला असेल. तेवढे मजले मी जोरदार पळाले आणि एका गर्दीच्या ठिकाणी गेले. तिथे एक सिग्नल होता. तिथल्या फुटपाथवर जाऊन बसले.”

हेही वाचा – Video: तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित; नेटकरी म्हणाले, “नवीन विषय काही सुचत नाही का तुम्हाला?”

“नंतर माझ्या कानावर आलं की, त्या माणसाला अटक झाली. ते प्रोडक्शन हाउस खोटं होतं. जो फ्लॅट होता, तो त्यांनी भाड्याने घेतला होता. तिथे सगळ्या फेक ऑडिशन होत्या. त्या माणसाने सगळ्यांना फसवलं होतं,” अशा भयानक अनुभवाचा उर्मिलाने खुलासा केला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress urmila nimbalkar was caught in the trap of fake audition pps