आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा आज वाढदिवस. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून त्यांना ओळखले जाते. माहेरची साडी या चित्रपटामुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या. एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी उषा नाडकर्णींनी त्यांना आलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल सांगितले.
उषा नाडकर्णी या काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील काळाबद्दल विविध मुद्द्यांवर भाष्य केले. उषा नाडकर्णी या अभिनेत्री होण्याआधी बँकेत नोकरी करायच्या. अभिनय, नोकरी, घर, नाटक अशी सगळी तारेवरची कसरत करत करत त्या इथवर पोहाचल्या. या प्रवासात त्यांना अनेक मदतीचे हात मिळाले. त्याउलट अनेक वाईट माणसंही भेटलीत. असाच एक वाईट अनुभव त्यांनी ‘बस बाई बस’च्या सेटवर शेअर केला.
आणखी वाचा : Video : “तुला बघते थांब…”, मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचं भर सेटवर भांडण, व्हिडीओ आला समोर
“ताई तुम्ही अनेक वर्ष बँकेत नोकरी केली. एखाद्या निर्मात्याने तुमचे पैसे दिले नाहीत तर तुम्ही त्याच्याकडून ते चांगलेच वसूल केले असतील?” असा प्रश्न त्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “या जगात जितकी चांगली माणसं आहेत, तितकीच लबाड माणसंही आहेत.”
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य
“मी एक मालिका करत होते. त्याचे १० एपिसोड करून मी सोडली. पण त्याचा एक पैसाही मला दिला गेला नाही. मी कित्येक वेळा मॅनेजरला फोन केला. पण फोन केला की वेगळीच माणसं फोन उचलून मॅनेजर नाही, असे सांगायचे. हा रोज कसा नसतो, असा प्रश्न मला पडायचा. पण एक दिवस गंमत झाली, त्या मॅनेजरनेच नेमका माझा फोन उचलला.”
“त्यावेळी मी त्याला एकच वाक्य बोलले. माझे पैसे देणार आहेस की नाही? नाहीतर मी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन तुझी चड्डी खोलेन आणि पैसे घेऊन जाईन. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी माझ्या घरी माझा चेक आला.” असे उषा नाडकर्णींनी म्हटले होते.