मालिकांमध्ये जेव्हा नवीन वळण येते, तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता वाढल्याचे दिसते. मालिकेत पुढे काय होणार, आपल्या आवडत्या पात्रांबरोबर काय घडणार, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात. आता झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) या मालिकेत नवीन एन्ट्री होणार असल्याचे दिसत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचे एक पोस्टर शेअर केले असून, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे.

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील एक पोस्टर शेअर केले आहे. त्यामध्ये एक व्यक्ती पाठमोरी उभी आहे आणि आकाश, वसुंधरा, अखिल, तनया, आकाशचा मोठा भाऊ, जयश्री व आकाशचे वडील, असा संपूर्ण ठाकूर परिवार त्या व्यक्तीचे स्वागत करण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. आकाशच्या बाबांच्या चेहऱ्यावर आनंद; तर जयश्रीच्या चेहऱ्यावर नाराजी, अशा संमिश्र भावनांचे व्यक्तिनिहाय चित्र पाहायला मिळत आहे. अखिल-तनयाच्या हातात आरतीचे ताट दिसत आहे. त्यांच्यासमोर असलेल्या महिलेचा चेहरा मात्र या पोस्टरमध्ये दिसत नाही. आता हे पोस्टर शेअर करताना झी मराठी वाहिनीने “ठाकूरांच्या घरी अचानक अवतरणारी ही व्यक्ती कोण असेल?”, अशी कॅप्शन दिली आहे.

Navri MIle Hitlarla
Video : “तू या लूकमध्येसुद्धा…”, सुनांचा डाव फसणार, लीलाचा धांदरटपणा एजेंना आवडणार; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “एक नंबर एजे”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
Paaru
‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’चा महासंगम; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “अशी अंधश्रद्धा…”
Drashti Dhami First Photo with Newborn Daughter
लग्नानंतर ९ वर्षांनी आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केला गोंडस लेकीचा फोटो
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
Navri mile hitlarla
सासरी परत येताच लीलाने केले एजेकडे दुर्लक्ष; तिन्ही सुनांना कामाला लावत म्हणाली, “आमच्यातील नाते…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

काय म्हणाले नेटकरी?

हे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर कमेंट करीत अनेक अंदाज वर्तवले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “जयश्रीची सासू असेल”, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “आकाशची मोठी आत्या असेल”, असे म्हणत अंदाज वर्तवले आहेत. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “कोणीतरी लांबची आत्या असेल, ती आली तरी तनयाच्या बाजूनेच होणार”, तर काही नेटकऱ्यांनी वंदना गुप्ते असतील, असा अंदाज वर्तवला आहे. तर एका नेटकऱ्याने किशोरी अंबिये यांचे नाव कमेंटमध्ये घेतले आहे. नेटकऱ्यांनी अशा प्रकारच्या कमेंट्स करीत मालिकेत कोणत्या अभिनेत्रीची व कोणत्या पात्राची एन्ट्री होणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रेक्षकांच्या कमेंट्समधून मालिकेत कोणाची एन्ट्री होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.

वंदना गुप्ते यांची मालिकेत एन्ट्री

आता मिळालेल्या माहितीनुसार, वंदना गुप्ते यांची मालिकेत एन्ट्री होणार आहे. त्या गुरूमाँच्या भूमिकेत दिसणार आहेत. गुरुमाँ, एक आध्यात्मिक मार्गदर्शक आणि माधवची म्हणजेच आकाशच्या बाबांची बहीण आहे. कुटुंबातील त्या मोठ्या सुनेची पारख करणार आहे. जयश्री, गुरुमाँची सर्व जबाबदारी वसुंधरावर सोपवते. वसुंधरा यामध्ये अपयशी ठरेल या आशेने जयश्रीने वसुंधराला ही जबाबदारी सोपविली आहे.

पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत आकाश व वसुंधरा अनेक संकटांतून मार्ग काढत सध्या सुखाने संसार करताना दिसत आहेत. संपूर्ण घर वसुंधराच्या विरोधात असताना आकाश तिच्यामागे खंबीरपणे उभा राहिला. तिला त्याने वेळोवेळी साथ दिली. तिच्याबद्दलचे घरच्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी त्याने खूप धडपड केली. तरीही, आकाशची आई जयश्रीच्या मनात अजूनही वसुंधराबद्दल राग असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने आकाशकडे कंपनीची जबाबदारी अखिलकडे देण्याची मागणी केली होती. वसुंधरासाठी आकाशने तेही मान्य केले. आता त्याने कंपनीचे सीईओ हे पद अखिलकडे सोपवले आहे. आता अखिल त्याची जबाबदारी योग्य रीतीने सांभाळू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अखिलची पत्नी तनया जयश्रीच्या मनात वसुंधराबद्दल गैरसमज निर्माण करताना दिसते.

हेही वाचा : “संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”

आता मालिकेत पुढे काय होणार, गुरूमाँच्या मालिकेत येण्याने नवीन वळण येणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader