‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह आज लग्नगाठ बांधणार आहे. मित्रपरिवार व नातेवाईकांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा विवाहसोहळा पार पडणार आहे. वनिता व सुमितच्या लग्नातील हळदी समारंभ पार पडला आहे.

हळदीचा समारंभातील वनिता व सुमितचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यांच्या हळदी कार्यक्रमातील एक व्हिडीओ पर्पल मराठी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वनिता व सुमित डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> हळद लागली! वनिता खरात-सुमित लोंढेच्या हळदी समारंभातील फोटो समोर

हेही वाचा>> “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

वनिता व सुमितने हळदीसाठी खास पांढऱ्या रंगाचा फुलांची डिझाइन असलेला पेहराव केला होता. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील कलाकारांनीही त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. कालच वनिताच्या मेहेंदी कार्यक्रम पार पडला. मेहेंदी सोहळ्यानंतर वनिताने नववधूचा हिरवा चुडा भरलेल्या हाताचा फोटो शेअर केला होता.

हेही पाहा>> Photos: लॉकडाऊनमध्ये मैत्री, लुडो खेळताना झालं प्रेम अन् आता थाटणार संसार; वनिता खरात-सुमित लोंढेची लव्हस्टोरी

वनिताचा होणारा नवरा सुमित एक एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. एका पिकनिकमध्ये वनिता व सुमित एकमेकांना भेटले. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची पिकनिकनंतर घट्ट मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये ते एकत्र लुडोही खेळायचे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ते विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

Story img Loader