‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्वच विनोदवीर हे सतत चर्चेत असतात. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. वनिता खरातने नुकतंच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

वनिता खरातची मैत्रीण आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने यात वनीचा काय विचार चालू आहे? असा प्रश्न विचारला आहे. यावर अनेक चाहत्यांनी कमेंट करत उत्तर दिली आहेत.
आणखी वाचा : “तुझी आठवण येतेय”, वनिता खरातसाठी पती सुमित लोंढेची पोस्ट, म्हणाला “माझ्या जीवनात…”

यावर एकाने “आज नवऱ्याला कसा त्रास देऊ? असा विचार वनिता करत असेल”, असे म्हटले आहे. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे. “मी नवऱ्याला त्रास देत नाही. मी खूप छान आणि प्रेमळ बायको आहे, हो की नाही सुमीत”, असे तिने म्हटले आहे.

vanita kharat
वनिता खरात पोस्ट

त्यावर सुमीतनेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने वनिताचा हा व्हिडीओ शेअर करत त्याला संमती दर्शवली आहे.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

दरम्यान वनिताने नाटकांपासून तिच्या अभिनयक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडपर्यंत मजल मारली. तिने २ फेब्रुवारी २०२३ रोजी बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर थाटामाटात लग्न केलं. तिच्या लग्नाला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.