‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील विनोदवीर सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. या कार्यक्रमातील कलाकारांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. तिने नाटकापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. वनिता खरातने किर्ती कॉलेजला प्रवेश का घेतला, यामागचे कारण समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच वनिता खरात, समीर चौगुले, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी कॉलेजच्या गंमतीजमतींबद्दल भाष्य केले. यावेळी वनिता खरातला तू किर्ती कॉलेज प्रवेश का घेतला? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर समीर चौगुले यांनी भाष्य केले.
आणखी वाचा : “लक्ष्या काकांचा तो वारसा मी चालवला”, आदिनाथ कोठारेने सांगितली खास आठवण, म्हणाला “ते सेटवर आले की…”

जेव्हा आपण एखाद्या कॉलेजला प्रवेश घेतो तेव्हा आपण घरापासून जवळ आहे. कधीकधी थेट ट्रेन आहे, थेट मेट्रो आहे किंवा या कॉलेजमध्ये हा विषय चांगला शिकवला जातो. आपण या गोष्टी पाहून कॉलेज ठरवतो. पण वनिताने किर्ती कॉलेजला प्रवेश घेतला कारण इथे वडापाव चांगला मिळतो, असे समीर चौगुले म्हणाले.

वनिता खरातचं सध्या डायटिंग सुरु आहे. एरव्ही ती पाच वडापाव खाते. आज ती तीनच वडापाव खाणार आहे, असेही समीर चौगुलेंनी सांगितले.

आणखी वाचा : “खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला “शिवरायांचं नाव असेल तर…”

दरम्यान वनिता खरात ही कॉलेजपासूनच एकांकिका स्पर्धेत सहभागी व्हायची. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. वनिता खरातला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली. विशेष वनिताने शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटातही काम केले होते. त्यात तिने एका मोलकरणीची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vanita kharat why took admission at kirti college samir choughule reveled nrp
Show comments