मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आपल्या नैसर्गिक अभिनयाने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे. सध्या त्या ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत झळकत आहेत. त्याबरोबरच त्या नवोदित कलाकारांना संधी कशी शोधायची याबाबत मार्गदर्शन करताना दिसतात. नुकतंच त्यांनी मालिकेत काम करणाऱ्या लहान मुलांबद्दल स्पष्ट मत नोंदवलं आहे.

वर्षा दांदळे या मनोरंजनसृष्टीतील संधी, ऑडिशन याबद्दल सोशल मीडियावर मनमोकळेपणाने संवाद साधत असतात. अनेकांना या क्षेत्रात आपलं नशीब आजमावून बघायचं असतं. परंतु या क्षेत्रात कोणीही ओळखीचं नसल्याने इथपर्यंत पोहोचायचं कसं हा मार्गच अनेकांना सापडत नाही. ऑडिशन कशा आणि कोणाकडे द्यायच्या याबाबत अनेकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झालेले असतात. त्या सतत याबद्दल मार्गदर्शन करत असतात.
आणखी वाचा : “…वाईट मनस्थिती झाली होती”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “फक्त दोन सीन…”

नुकतंच त्यांनी अभिनेता म्हणून स्वतःला तयार करताना, काय काय गोष्टींची आवश्यकता असते? याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या. यावर एकाने कमेंट करत वर्षा दांदळेंना प्रश्न केला आहे. “माझी नात आहे १४ महिन्याची तिच्यासाठी आम्ही सर्व खटाटोप करतोय”, असा प्रश्न एकाने विचारला आहे.

त्यावर वर्षा दांदळेंनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. “तिच्या आवडीनिवडी तिला ठरवू द्या…तिचं गोड बालपण तिला तुमच्यासोबत उपभोगू द्या. तुम्हाला सांगू का…सिरीयलमध्ये जी लहान मुले असतात, त्यांना त्यांचं बालपण भोगायलाच मिळत नाही. दया येते त्यांची”, अशी त्यांनी कमेंट केली आहे.

varsha dandale comment
वर्षा दांदळे कमेंट

आणखी वाचा : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? चर्चांवर अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली…

दरम्यान वर्षा दांदळे यांनी ‘पाहिले नं मी तुला’ या मालिकेत काम केले आहे. त्यांनी या मालिकेत उषा म्हणजेच अनिकेतच्या आईचे पात्र साकारले आहे. ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. त्याबरोबर त्यांनी ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत वच्छी आत्या ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

सेच वर्षा यांनी ‘एकाच या जन्मी जणू’, ‘आनंदी हे जग सारे’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केले आहे. अभिनयाबरोबरच वर्षा यांनी सवेरेंवाली गाडी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. सध्या त्या ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत.

Story img Loader