छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वीणा जगतापला ओळखले जाते. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून ती प्रसिद्धीझोतात आली. वीणा ही सध्या यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. मात्र आता वीणा एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. नुकतंच याबद्दल पोस्ट करत वीणाने संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वीणा जगतापने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने एक मेट्रोमोनियल साईटवरचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिचे मेट्रोमोनियल साईटवरील प्रोफाईल पाहायला मिळत आहे. याचा एक स्क्रीनशॉट तिने शेअर करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

वीणा जगताप काय म्हणाली?

“मला नुकतंच एका चाहत्याने हा स्क्रीनशॉट शेअर केला आणि हे पाहिल्यानंतर मला धक्का बसला. मला अजिबात कळत नाही की माणसं असं का करतात? मेट्रोमोनियल साईटवरही खोटी माहिती.

विशेष म्हणजे मी सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे याची मलाही कल्पना नाही. मी कधीच कोणत्याही मेट्रोमोनियल साईटवर नव्हते आणि नसेन. मी गेल्यावर्षीदेखील अशाचप्रकारे खोटी बातमी ऐकली होती. त्यामुळे अशा खोट्या प्रोफाईलपासून सावध राहा. पण काहीही म्हणा, हे प्रोफाईल बनवणाऱ्या व्यक्तीच्या हिंमतीची मला दाद द्यावीशी वाटते”, असे वीणा जगतापने म्हटले आहे.

वीणा जगताप पोस्ट

आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

दरम्यान वीणाने काही दिवसांपूर्वी अधिकृत मेकअप आर्टिस्ट म्हणून पदवी संपादन केली. त्यानंतर तिने गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेत नवीकोरी गाडी खरेदी केली होती. वीणाचा चाहता वर्गही मोठा आहे. ती कायमच सोशल मीडिवरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress veena jagtap angry on matrimonial fake profile share post nrp