छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वीणा जगतापला ओळखले जाते. ती कायमच चर्चेत असते. वीणा ही सध्या यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वीणाने अधिकृत मेकअप आर्टिस्ट म्हणून पदवी संपादन केली. त्यानंतर आता वीणाने चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वीणा जगताप ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच वीणाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टद्वारे तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वीणाने नुकतंच एक नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. तिने तिच्या गाडीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : Video : “मला भीती वाटत होती, पण केवळ त्यांच्यामुळे…” वीणा जगतापने सांगितला ‘तो’ किस्सा

“आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचे स्वागत. माझी पहिली गाडी… मेड इन इंडिया. व्होकल फॉर लोकल, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. वीणाने टाटा मोटर्सची टाटा पंच ही गाडी खरेदी केली आहे. तिने स्वत: हॅशटॅग देत याबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

दरम्यान काही दिवसांपूर्वीच वीणाने एक व्हिडीओ शेअर करत गाडीचे प्रशिक्षण घेतल्याचा अनुभव शेअर केला होता. त्यावेळी तिने तिला उत्तम गाडी चालवता येते हे देखील सांगितले होते.

“मी पहिल्या दिवशी गाडी चालवायला हातात घेतली त्यावेळी मी ड्रायव्हर दादांना मला गाडी चालवायला येईल का? असे विचारले होते. पण त्यानंतर त्यांनी मला आत्मविश्वास दिला की, तुम्हाला आम्ही गाडी शिकवल्यावर तुम्ही नक्कीच शिकाल. त्यामुळेच मला दहाव्या दिवशीच गाडी चालवण्याचा आत्मविश्वास आला”, असे वीणा जगताप म्हणाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress veena jagtap buy new car share post good news post nrp