मराठी मालिकांमध्ये नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये वीणाने एण्ट्री केली. त्यानंतर ती आणखीनच प्रकाशझोतात आली. ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरेशी असलेलं तिचं नातं अगदी चर्चेचा विषय ठरलं. शिवाय गेल्या काही दिवसांपासून शिव व तिचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यादरम्यान तिने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
वीणाने नवी गाडी खरेदी केली आहे. गाडीचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. वीणाने गाडीबरोबरचा एक फोटोही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. वीणा हा फोटो शेअर करत म्हणाली, “कुटुंबामध्ये भर पडली. माझी पहिली कार. मेड इन इंडिया”.
वीणाच्या चेहऱ्यावरील आनंद या फोटोमध्ये दिसून येत आहे. तिने टाटा मोटर्सची टाटा पंच ही गाडी खरेदी केली आहे. मेड इन इंडिया गाडी घेतल्याचाही वीणाला आनंद आहे. या गाडीची किंमत लाखोंच्या घरात आहे. सहा लाखांपासून ते अगदी दहा लाखांपर्यंत ही गाडी तुम्ही खरेदी करू शकता.
वीणाने गाडी खरेदी करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही वीणाचं नवी कारण घेण्याबाबत अभिनंदन केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच ती गाडी चालवण्याचं प्रशिक्षण घेत होती. याबाबत तिने तिच्या युट्युब चॅनलद्वारे व्हिडीओ शेअर करत माहिती दिली.