छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वीणा जगतापला ओळखले जाते. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून घराघरात पोहोचली. वीणा ही कायमच आगामी प्रोजेक्ट, करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. नुकतंच वीणाच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
वीणा जगताप ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच वीणाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात वीणाने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती छान चॉकलेटी रंगाची साडी नेसल्याचे दिसत आहे. त्याबरोबर तिने गजरा, बांगड्या, ठूशी असा पारंपारिक लूकही केला आहे. विशेष म्हणजे वीणाने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या भांगेत कुंकू पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली
वीणाने या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे. यात तिने ‘प्यार हुआ,,,,इकरार हुआ’ असे म्हटले आहे. त्याबरोबर तिने दोन हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.
आणखी वाचा : पालकांच्या प्रायव्हसीबद्दल हेमांगी कवीचे बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाली…
वीणाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट करत ‘कोण आहे तो नशीबवान मुलगा, ज्याची तू पत्नी होणार आहे’, असे विचारले आहे. तर काहींनी तिला ‘तू खूप सुंदर दिसतेस’, असे म्हणत कमेंट केली आहे.
दरम्यान वीणा जगताप ही सध्या यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वीणाने अधिकृत मेकअप आर्टिस्ट म्हणून पदवी संपादन केली. त्यानंतर तिने गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेत नवीकोरी गाडी खरेदी केली होती. वीणाचा चाहता वर्गही मोठा आहे. ती कायमच सोशल मीडिवरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.