गेल्या काही दिवसांपासून विविध मराठी कलाकारांना प्रवासादरम्यान वाईट अनुभव आल्याचे पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री विद्या करंजीकर या गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. नुकतंच त्यांचे पती दीपक करंजीकर यांनी विद्या करंजीकर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात विद्या करंजीकर यांनी नाशिकहून मुंबईत परत येताना त्यांना झालेल्या त्रासाबद्दल संताप व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी एका कामानिमित्त विद्या करंजीकर नाशिकला गेल्या होत्या. नाशिकहून मुंबईत परत येण्यासाठी त्यांनी प्रायव्हेट गाडीचा पर्याय निवडला. मात्र त्याचा त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी नेमकं काय घडलं, याचा सविस्तर व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं स्वत:च घर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला “कर्ज, जमवाजमव अन्…”

विद्या करंजीकर यांनी काय म्हटलं?

नमस्कार मंडळी, नाशिक-मुंबईच्या प्रवासादरम्यान मला एक विचित्र अनुभव आला, तो तुम्हाला सांगावासा वाटतोय. काल मी नाशिकहून मुंबईला आले. येताना मुंबई नाक्यावरती ज्या प्रायव्हेट गाड्या असतात, पर सीट घेऊन येणाऱ्या तिथे उभी होते. माझ्याबरोबर एक माणूस उभा होता. अजून दोन पॅसेंजरची आम्ही वाट बघत होतो. अर्ध्या एक तासाने एक माणूस आला तिसरा पॅसेंजर म्हणून आणि चौथ्या पॅसेंजरची आम्ही वाट बघत होतो. तेवढ्यात एका गाडीतून एक माणूस एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आला. ते कुत्र्याचं पिल्लू बास्केटमध्ये ठेवलेलं होतं. तो माणूस आमचा सीट भरणारा जो कोर्डिनेटर होता, त्याच्याशी काहीतरी बोलला. त्यानंतर तो माणूस म्हणाला चला चला मॅडम चला. चौथी सीट भरली, झालं.

मी एकदम जरा चकित झाले, म्हटले आहो कुत्र्याचं पिल्लू आणि तो माणूस. तर तो नाही नाही काही प्रॉब्लेम नाही बसा, असे म्हणाला.मी पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसले आणि पाठी दोन पॅसेंजर बसले होते. त्या माणसाने ते कुत्र्याचं पिल्लू त्या बास्केटमध्ये भरलेलं त्या दोघांच्या मध्ये ठेवलं. मी म्हटलं असं कसं काय, काच खाली केली आणि त्या माणसाला विचारलं आहो तुम्ही नाही येत? तर त्यावर तो म्हणाली, नाही नाही मॅडम. एकटच पिल्लू तुमच्याबरोबर येणार आहे. तर मी म्हणाले असं कसं काय? त्यावर तो म्हणाला आम्ही नेहमी असं करतो. हायवेवर एक माणूस त्याला उतरवून घेईल. मी त्याला म्हटलं असं कसं काय, जर मध्येच त्या पिल्लाला काही त्रास झाला तर. त्यावर त्याने नाही, काही प्रॉब्लेम नाही. आताच त्याला खायला दिलंय, तो गप्प बसेल.

मी म्हटलं तो ओरडेल तर म्हणे नाही आणि त्याने सू शी केली तर? गाडी एसी आहे. पूर्ण बंद असते. वास येईल. त्यावर त्याने काही प्रॉब्लेम नाही होणार मॅडम. त्यानंतर सीट भरणारा तो माणूसही घाई करायला लागला, चला चला मॅडम लवकर चला. तुम्ही खूप वेळापासून इथे उभे आहात, लवकर चला.

मी ठिक आहे म्हटलं कारण मला मुंबईला जायचंच होतं. मी गाडीत बसले. मी पुढे, शेजारी ड्रायव्हर आणि पाठीमागे ते दोन पॅसेंजर आणि मध्ये कुत्र्याचं पिल्लू. आमचा प्रवास सुरु झाला आणि मला अपेक्षित होतं तेच घडलं. गाडी हायवेला लागली आणि जेव्हा स्पीड घेतला तेव्हा मध्ये खड्डे यायचे. गाडी खड्ड्यात गेली की ते कुत्र्याचं पिल्लू ओरडायला लागायचं. ते पिल्लू अगदी गोड काळ्या रंगाचं छोटंस होतं. मला काय करावं ते कळेना, तो माणूस येईपर्यंत तीन-ते चार तास होते.

त्यानंतर मग मी ड्रायव्हरला विचारलं की तुम्ही ते accept का केलं ? reject का नाही केलं? मॅडम मला वाटलं की तो व्यक्तीही त्याच्यासोबत येतो आहे. मी म्हटलं पण जेव्हा तुम्हाला समजलं की तो येणार नाही, तेव्हाच रिजेक्ट करायचं होतं. त्यावर तो म्हणाला, काय करु मॅडम, मी उबरचा ड्रायव्हर आहे. काल चार वाजल्यापासून नाशिकला आलोय. पण आतापर्यंत कोणी पॅसेंजर मिळालं नाही. त्यामुळे मग मी घेतले. सगळेच पोटार्थी. काय करणार आम्ही निघालो. मी त्याला म्हटलं अरे पण आपल्याला वॉशरुमसाठी चहा पिण्यासाठी मध्ये थांबायला लागेल. आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो आणि चहा पिऊन परत आलो. त्यानंतर गाडी सुरु झाली तेव्हा ते कुत्र्याचं पिल्लू परत ओरडायला लागलं. ते अगदी छोटंसं होतं. त्याला कळतंही नसेल.

त्यानंतर आमचा प्रवास परत सुरु झाला. मी त्या ड्रायव्हरला म्हटलं, त्या पिल्लाला पिकअप करायला जो माणूस येणार आहे, त्याला तू आधीच व्यवस्थित ठिकाणी उभा राहा नाहीतर आपण जाऊ आणि तो तिथे नसेल. नेमकं तेच घडलं. आम्ही तिथे जाऊन पोहोचलो, त्या माणसाचा काही पत्ताच नव्हता. १५ मिनिटं झाली, २० मिनिटं झाली, अर्धा-पाऊण तास झाला आणि मग माझे पेशन्स संपले. मी तिकडे जवळ असलेल्या एका पोलीस चौकीमध्ये गेले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यावर पोलीस म्हणाले, गाडी तुमची आहे का? तर मी म्हटल नाही मी फक्त पॅसेंजर आहोत. तर ते म्हणाले तुम्ही का तक्रार करताय. त्या ड्रायव्हरने तक्रार करायला हवी. तर मी म्हटलं मला याचा त्रास सहन करावा लागतो आणि मला लवकरात लवकर पोहोचायचं, त्यामुळे मग मी तुमच्याकडे तक्रार करते. तुम्ही ते कुत्र्याचं पिल्लू तुमच्या ताब्यात घ्या आणि आम्ही त्या माणसाला सांगतो तो तुमच्याकडून पिकअप करेल.

त्यावर तो पोलीस म्हणाला, नाही मॅडम असं काही होत नाही. तुमची गाडी कुठे आहे. त्यावर मी त्याला गाडी दाखवली आणि तो माझ्याबरोबर आला. त्याने उबर ड्रायव्हरला ओरडायला सुरुवात केली. त्याचं लायसन्स पाहिलं. फोटो काढला. नंबरप्लेटचा फोटो वैगरे काढून घेतला आणि नंतर चला इथे अर्धा तासापेक्षा जास्त थांबायचं नाही. तो जो कोणी माणूस आहे, त्याला फोन करुन बघा नाहीतर पुढे पालिकेचे ऑफिस आहे तिकडे ते कुत्र्याचं पिल्लू द्या. आम्ही कुत्र्याचं पिल्लू इथे ठेवत नाही. त्यावर मी त्याला आम्हाला घाई आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही आम्हालाच काय कामाला लावताय. त्यावर तो पोलीस म्हणाला, मग तुम्ही आम्हाला कामाला का लावताय, हे काय आमचं काम आहे का?

तो माणूस इथून ते पिल्लू घेऊन जाऊ शकतो, म्हणून मी ते इथे ठेवा असं सांगते. त्यावेळी दुपारचे १२ वाजले होते. त्यानंतरही तो पोलीस तुम्ही पुढे जा आम्हाला काही सांगू नका, असे सांगायला लागला. आम्ही गाडी काढली आणि थोडे पुढे गेलो तेवढ्यात त्या माणसाचा फोन आला. तो आम्हाला कुठे आहात, वैगरे विचारायला लागला. त्यावर त्या ड्रायव्हरने आम्हाला पोलिसांनी थांबू दिलं नाही, आम्ही पुढे आलो. तर तो म्हणाला थांबा मी तिथे येतो. तर त्या ड्रायव्हर सर्वांना घाई आहे, तुम्ही त्या पॅसेंजरशी बोला.

त्याने मला फोन दिला आणि मी त्याला झापलं. त्याला मी विचारलं तर त्याने मी दुसऱ्या ठिकाणी उभा होतो, अशी कारण मला दिली आणि मग दहा मिनिटात मी येतो असं म्हणाला. आम्ही गाडी थांबवली. तो माणूस दुचाकीवर आला. आधीच ते कुत्र्याचं पिल्लू घाबरलेलं होतं. त्याला मी म्हटलं तू हे कुत्र्याचं पिल्लू विकत घेतलंस, त्याचं चुकलं आहे, तो त्याला असंच सहज पॅसेंजरसारखं पाठवून देतो. पेटाच्या कुणी कार्यकर्ते असतील तर असं चालतं का एक छोटंसं चार पाच महिन्याचं पिल्लू असेल, त्याला चक्क ते एका पॅसेंजरचे पैसे भरुन पाठवून देतात. ते असं नेहमी करतात असंही ते बोलत होते. मला याचं फार आश्चर्य वाटतंय. मला याबद्दल तक्रार नोंदवायची आहे, त्यामुळे मला कृपया मार्गदर्शन करा, असे विद्या करंजीकर यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : रणदीप हुड्डाची बायको लिन लैशराम कोण आहे? कशी आहे या दोघांची लव्हस्टोरी?

दरम्यान विद्या करंजीकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करत त्यांना तक्रार करण्यासाठी सल्ला देत आहेत.