‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली विशाखा सुभेदार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या पोस्ट शेअर करत असते. तिचे डान्स व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. तिच्या सुंदर हावभावाचा एक मोठा चाहता वर्ग आहे. नुकताच तिने भाची राधा शिंदेबरोबरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विशाखा सुभेदार भाचीबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसत असून नेटकरी दोघींचं खूप कौतुक करत आहेत.

“माझ्या लाडक्या भाचीबरोबर मस्ती”, असं कॅप्शन लिहित विशाखा सुभेदारने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री भाचीबरोबर सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’ चित्रपटातील ‘नाच मेरी जान’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. दोघींच्या जबरदस्त डान्ससह हावभावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gani Bavari Viral Video
‘डान्स असावा तर असा…’ ‘घनी बावरी’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

हेही वाचा – Bigg Boss 18: “मला करणवीरचा जीव घ्यायचा आहे”, एलिस कौशिकने दिली थेट धमकी, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

विशाखा सुभेदार आणि भाची राधाच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुमच्या दोघींचे हावभाव खूप भारी आहेत. तुम्ही दोघी खूप गोड आहात. देवाचे सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहो.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “वॉव..काय एनर्जी आहे…तुम्ही खूपचं छान डान्स केला आहात.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, राधा सेम तुझ्यासारखी दिसतेय लहान विशू आणि मोठी विशू. चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुमचा वारसा ही पुढे चालवणार.”

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने भाऊबीजनिमित्ताने धनंजय पोवारला दिलं हटके गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वहिनीला…”

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हेही वाचा – Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम वीणा जगतापने मेघा धाडेला दिवाळीनिमित्ताने दिलं खास गिफ्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, विशाखा सुभेदारची भाची राधा शिंदे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ती मराठी मालिकांमध्ये छोट्या भूमिका करते. जून महिन्यात राधा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये झळकली होती. विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिचा ‘पाणी पुरी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित ‘पाणी पुरी’ चित्रपटात विशाखासह मकरंद देशपांडे, सायली संजीव, हृषिकेश जोशी, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलाश वाघमारे, शिवाली परब असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. १५ नोव्हेंबरला ‘पाणी पुरी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटात विशाखा सुभेदार झळकणार आहे.

Story img Loader