‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार . विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर विशाखाने प्रेक्षकांची मनं जिंकली. विशाखा फक्त विनोदी भूमिका नाही तर खलनायिकेची भूमिका देखील तितक्याच उत्तम रित्या निभावते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘शुभविवाह’ मालिकेतील तिने साकारलेली रागिणी. ज्याप्रमाणे मालिकेतील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या भूमिकेवर प्रेक्षक प्रेम करतात त्याप्रमाणे विशाखा सुभेदारच्या खलनायिकेच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. अशातच विशाखाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेत्री विशाखा सुभेदारला नुकतंच राम नगरकर पुरस्कार सोहळा २०२४मध्ये गौरविण्यात आलं. याचे काही फोटो शेअर करत तिने एक खास पोस्ट लिहिली. विशाखाने लिहिलं, “राम नगरकर पुरस्कार सोहळा…२०२४ हा पुरस्कार या माझ्या गुरुस्थानी असलेल्या दोन सचिन मास्तर यांच्याकडून मिळाला हे ही माझं भाग्य. हा पुरस्कार देण्याचे ज्यांनी ठरवलं ते वंदन नगरकर हे हयात नाही याचे मात्र वाईट वाटले.”

“‘फु बाई फु’ ते ‘हास्यजत्रा’…विनोदी प्रहसन सादर करीत आले, त्याची शाबासकी मिळाली. पुरस्कार म्हटलं की जबाबदारी आलीच…जरी हास्यजत्रातून बाहेर पडले याचा अर्थ असा नाही होत की विनोदी अभिनय करणं सोडलं…एक ब्रेक घेतला होता पुन्हा एखाद्या विनोदी भूमिकेत दिसेनच…रसिकांचे आणि नगरकर कुटुंबियांचे खूप आभार,” असं विशाखाने लिहिलं आहे, अभिनेत्रीच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या. तिचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – मुग्धा वैशंपायनचा पहिला गुढीपाडवा, तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छा देत विचारलं, “प्रथमेशकडून काय गिफ्ट मिळालं?”

हेही वाचा – Video: रितेश देशमुखने मुलांसह उभारली गुढी, जिनिलीया व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “पहाटे आमची…”

दरम्यान, विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने विनोदी कार्यक्रम आणि मालिकांव्यतिरिक्त बऱ्याच चित्रपट, नाटकात काम केलं आहे. अलीकडेच ती ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने शार्पशूटर मग्रूची भूमिका साकारली होती. सध्या तिचे रंगभूमीवर ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक सुरू आहे.