अभिनेत्री विशाखा सुभेदार या कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या त्या त्यांच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. त्यांना कायमच विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाते. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतंच विशाखा सुभेदार यांच्या एका चाहत्याने त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर विशाखानेही भन्नाट उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशाखा सुभेदार या नेहमीच इन्स्टाग्रामवर सक्रीय असतात. त्या कायमच विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. विशाखा सुभेदार यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये त्या एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. विशाखा सुभेदारने नुकतंच एका चाहत्याच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर पुढे काय करणार? विशाखा सुभेदारने केला खुलासा

विशाखा सुभेदारच्या जगदीश नावाच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे. “मॅडम तुम्ही कॉमेडी खूप छान करता तुम्हाला भेटण्याचा योग कधी येईल सांगता येत नाही. नशिबामध्ये असेल तर तुम्हाला एक वेळेस भेटण्याची इच्छा आहे माझी”, असे त्याने म्हटले. त्यावर विशाखा सुभेदारने प्रतिक्रिया दिली आहे. “नाटक बघायला या…कुर्रर्रर्रर्र हे नाव आहे नाटकाचं”, असे तिने म्हटले आहे.

विशाखा सुभेदारच्या या प्रतिक्रियेवर त्या चाहत्याने कमेंट केली आहे. “तुम्हाला या व्हिडीओबद्दल बोलत नाही. मी टीव्हीवरती तुम्हाला खूप पाहतो. मी तुमची कॉमेडीची टीम खूप मस्त आहे”, असे म्हटले आहे.

आणखी वाचा : “एखादी जाडी बाई…” विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत

दरम्यान विशाखा सुभेदार यांनी ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३) अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या कुर्रर्र या नाटकात काम करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vishakha subhedar react on fan comment goes viral nrp