अभिनेत्री विशाखा सुभेदार कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिला विनोदी भूमिकांसाठी खास ओळखले जाते. सध्या विशाखा ही ‘कुर्रर्रर्र’ या नाटकासाठी अमेरिकेत गेली आहे. त्याबरोबरच विशाखा सुभेदार ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत काम करत आहे. नुकतंच तिने या मालिकेबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
विशाखा सुभेदारने ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. आता सध्या विशाखा ही ‘शुभविवाह’ या मालिकेत रागिणी हे पात्र साकारताना दिसत आहे. नुकतंच तिने या पात्राचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : वर्षभराच्या ब्रेकनंतर विशाखा सुभेदार करणार मालिकेत पुनरागमन, प्रोमो समोर
विशाखा सुभेदार यांची पोस्ट
“मिसिंग रागिणी….. शुभविवाह..! स्टारप्रवाह वर.. दुपारी दोन वाजता..! नव्या सिरीयल,नवीन भूमिकेतून,लगेचच इतका मोठा ब्रेक घेणं शक्य नसत.. पण खुप आधीपासून ठरलेला हा दौरा..त्यामुळे ह्या तारखेला मी नसणार.. हे माहित असूनही इतकी महत्वाची भूमिका मला दिलीत… माझा हा दौरा तुम्ही अॅडजस्ट केलात. खरंच तुमचे मनापासून आभार.. स्टार प्रवाह आणि आमचे प्रोड्युसर महेश तागडे ह्यांचे ही आभार.
रागिणी रंगवण..जीव ओतून करते आणि करत राहीन. मिसिंग रागिणी”, असे विशाखा सुभेदारने म्हटले आहे.
आणखी वाचा : तब्बल १४ महिन्यांनी विशाखा सुभेदार यांनी लता मंगेशकरांनी दिलेल्या साडीची घडी मोडली, म्हणाल्या “हे वस्त्र…”
दरम्यान विशाखा सुभेदार ही सध्या कुर्रर्रर्र या नाटकाच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर गेली आहे. विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे हे कलाकार सध्या अमेरिकेत गेले आहेत. त्याबरोबरच विशाखा ही स्टार प्रवाह वाहिनीवर शुभविवाह या मालिकेतही झळकत आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट यात दाखवली जात आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.