अभिनेत्री विशाखा सुभेदारने सुरुवातीला आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. ‘फूबाईफू’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून विशाखा घराघरात पोहोचली. मग विशाखा मालिका, चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारताना दिसली. सध्या तिची ‘शुभविवाह’ मालिकेतील खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. नुकतीच विशाखा सुभेदारने पती महेश सुभेदार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशाखा सुभेदारचे पती महेश सुभेदार यांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. ‘मी VS मी’ असं नाटकाचं नाव आहे. या नाटकात महेश सुभेदार यांच्यासह क्षितीश दाते, चिन्मय पटवर्धन, दिनेश सिंह, शिल्पा तुळसकर आणि ऋषिकेश जोशी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. २५ जानेवारीला या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. त्यानिमित्ताने विशाखा सुभेदारने पतीला शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने ‘अशी’ साजरी केली पहिली मकरसंक्रांत, फोटो झाले व्हायरल

अभिनेत्री विशाखा सुभेदारने ‘मी VS मी’ नाटकाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “ऑल द बेस्ट नवरोबा…महेश सुभेदार खूप खूप शुभेच्छा. खूप गोष्टी सांभाळून आणि अतिशय महत्वाचं म्हणजे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून नाटक करतो आहेस, त्याबद्दल तुझं खूप कौतुक. मी एकमार्गी कामं करत असते पण तू दाही दिशांना धावत असतोस…नाटक म्हणजे ‘कलाकाराचा जीव’, पुन्हा एकदा रंगभूमीचा वास सहवास.. तुला खूप खूप शुभेच्छा, अनेक प्रयोग होऊ देत. नाट्यनिर्माते श्रीमंत होऊ देत. २५ जानेवारीपासून शुभारंभ आहे. नाटकाचा पहिला प्रयोग आणि तुझा वाढदिवस काय कमाल योग.” अभिनेत्रीच्या या पोस्टवर काही चाहत्यांनी प्रतिक्रिया देत महेश सुभेदार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: दोन वर्षांच्या मुलीवरून खिल्ली उडवल्यामुळे विवियन डिसेना भडकला करणवीर मेहरावर, रागातच्या भरात केलं ‘हे’ कृत्य

हेही वाचा – Bigg Boss 18: “ये बंधन तो…”, करण-विवियनचा शिल्पासह जबरदस्त परफॉर्मन्स, बहीण नम्रता शिरोडकर म्हणाली…

दरम्यान, विशाखा सुभेदारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘शुभविवाह’ मालिकेसह विविध चित्रपट, नाटकात पाहायला मिळत आहे. लवकरच विशाखाचंसुद्धा नवं नाटक रंगभूमीवर येणार आहे. संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘द दमयंती दामले’ या नव्या नाटकात विशाखा दिसणार आहे. या नव्या नाटकाचा शुभारंभ फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘द दमयंती दामले’ नाटकाची घोषणा झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vishakha subhedar share special post for husband mahesh subhedar pps