‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विशाखा सुभेदार नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून विशाखा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सुरू असलेल्या खेळाविषयी परखड मतं मांडताना दिसत आहे. अशातच विशाखा सुभेदारच्या भावुक पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही भावुक अभिनेत्रीने आपल्या लाडक्या मुलासाठी लिहिली आहे. विशाखा सुभेदारचा मुलगा आता पुढील शिक्षणासाठी परदेशात निघाला आहे. यानिमित्ताने विशाखाने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री विशाखा सुभेदारने मुलाला विमातळावरून सोडतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या मुलाला सोडण्यासाठी कुटुंब जमलेलं पाहायला मिळत आहे. यामध्ये पंढरीनाथ कांबळेची मुलगी आणि अभिनेता यशोमन आपटे दिसत आहे. हे खास क्षण शेअर करत विशाखाने लिहिलं आहे, “आज आमचा अबू…अबुली…निघाला पुढील शिक्षणासाठी लंडनला…M. A. In film making ( spl direction ) करायला Plymouth ( प्लायमाउथ ) शहरात…अबू.. तू जी जी स्वप्न पाहिलीस ती ती पूर्ण होवो…अतिशय मेहनती आणि झोकून देऊन काम पूर्ण करण्यातला आहेस तू…आत्ता ही जायचं म्हटल्यावर त्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी तू सक्षमपणे पार पाडल्या…आणि त्यासाठी आम्हाला मदत केली नवी मुंबई, वाशी मधल्या wisdome career education या मंडळीने..! जातीने ते लक्ष घालतात…त्याचे ही खूप खूप आभार…”

Vishakha Subhedar

हेही वाचा – “निक्कीने बिग बॉसला विकत घेतलं आहे…”, मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख काही बोलले नाही तर…”

“माझ्या समजूतदार हुशार बाळा…”

पुढे अभिनेत्रीने लिहिलं आहे, “सगळ्यात आनंदाची गोष्ट अबू.. तुला plymouth युनिव्हर्सिटीकडून मिळालेली स्कॉलरशिप ५० टक्के ऑफ… तुझ्या मार्कलिस्टवर वर्क एक्सपेरियन्समुळे आणि तुझ्या इच्छाशक्तीने केलीय कमाल…यापुढेही तिच मनिषा बाळग…दूरदेशी तू माणसं जोडशीलच कारण अतिशय लाघवी गुणी स्वभावाचा आहेस तू…जां अबुली जी ले जिंदगी…आणि खूप छान शिकून ये… तयारीचा गडी होऊनच ये. बाकी सगळं तुला तर माहितीय,सगळं काही तुझ्याचसाठी…माझ्या समजूतदार हुशार बाळा…लव्ह यू अबुली…मी आणि बाबा तुला प्रचंड मी करणार…पण आई बाबा तुझ्या स्वप्नांसाठी कायम तुझ्या पाठीशी उभे राहणार.”

हेही वाचा – Video: “वैभव आतापर्यंत ‘बिग बॉस’मध्ये बॉडीमुळे आहे”, निक्की तांबोळीचं विधान, अरबाजला म्हणाली…

अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या या खास पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशाखाचा मुलगा अभिनयवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. दरम्यान, विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘शुभविवाह’ मालिकेत रागिणीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तिने साकारलेली ही खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vishakha subhedar son leaves for further education abroad pps