अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या ‘पाणीपुरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १५ नोव्हेंबरपासून चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट ‘पाणीपुरी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात विशाखा सुभेदारने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी ‘पाणीपुरी’ चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा पार पडला. या टीझर लाँच सोहळ्याला विशाखा सुभेदारला घटस्फोटाबाबत विचारण्यात आलं. तेव्हा ती काय म्हणाली? जाणून घ्या…

माध्यमांशी संवाद साधताना अभिनेत्री विशाखा सुभेदारला घटस्फोटाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा विशाखा म्हणाली, “लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात असं मला वाटायला लागलं आहे. एकमेकांना बांधून ठेवणं, मेरेपर्यंत सहवास असणं, आता ही काळाची गरज आहे. घटस्फोटाबद्दल बऱ्याच चित्रपटांमध्ये हे बोललं गेलंय.”

Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

हेही वाचा – Bigg Boss 18मध्ये इन्फ्लुएन्सर, इकडे गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर केली ब्रेकअपची घोषणा, सात महिन्यात संपलं नातं

पुढे विशाखा सुभेदारी म्हणाली, “मला एक प्रसंग आठवतोय. माझे सासरे एका सकाळी उठले आणि रडले. ते रडतचं उठले होते. तर आम्ही सगळेजण म्हणालो, काय झालं? तुम्ही का रडताय? तर त्यावेळेस असं झालं होतं की आमच्या कुटुंबात एकाचा घटस्फोट होतं होता. त्यासाठी माझे सासरे रडत होते. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. तुम्ही शांत राहा. ते जे रडणं होतं ना, ते आता ठीक आहे इथेपर्यंत येऊन पोहोचलं आहे. नात्यांमधलं मर्म हरवतं चाललं आहे. ते या चित्रपटात जोपासलं गेलं आहे.”

त्यानंतर चित्रपटातील भूमिकेबद्दल विशाखा म्हणाली की, ‘पाणीपुरी’तलं जे काही खारटं आहे ते मी आहे. तो मिठाचा खडा मी मुलीच्या सतत संसारात टाकत असते. तर अशा आईचं कॅरेक्टर जे कसं असू नये हे रमेश आणि संजय सरांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. ते मी कसोशीने निभावण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप मजा आली. माझा सुद्धा मुलगा तेवीशीतला आहे. काही वर्षांनी त्याचं लग्न होईल. त्या मुलांना नातं काय आहे, लग्न काय आहे, हे समजण्यासाठीचा हा चित्रपट आहे.

हेही वाचा – Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा

हेही वाचा – “ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…

दरम्यान, ‘पाणीपुरी’ चित्रपटाचं दिग्दर्शन रमेश चौधरी यांनी केलं आहे. या चित्रपटात विशाखा सुभेदार व्यतिरिक्त अभिनेते मकरंद देशपांडे, सायली संजीव, हृषिकेश जोशी, प्राजक्ता हनमघर , कैलाश वाघमारे, शिवाली परब, अनुष्का पिंपुटकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Story img Loader