विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. परंतु, अनेकदा तिला वजनावरून ट्रोल केलं आहे. पण याला विशाखाने चोख उत्तर देऊन ट्रोलर्सची तोंडं बंद केली आहेत. अशा विनोदी भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या विशाखाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “मला बऱ्याचदा ऑनस्क्रीनवरील मी आवडत नाही”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी असं म्हणाली? जाणून घ्या…

अभिनेत्री विशाखा सुभेदारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘शायराना’ या गाण्यावरील तिच्या अदाकारी पाहायला मिळत आहेत. तसेच विशाखाने खूप सुंदर हावभाव केले आहेत, जे चाहत्यांना फारच आवडले आहेत. या व्हिडीओला तिने मजेशीर कॅप्शन दिलं आहे. तिने लिहीलं आहे की, “तू माझं अत्तर आहेस… म्हणून तर जगणं बेहत्तर आहे.. (यमक जुळवण्याचा प्रयत्नतर केला आहे.)”

हेही वाचा – Video: अखेर क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींची पहिली झलक समोर; अभिनेत्रीने शेअर केला गोड व्हिडीओ

कॅप्शन जरी मजेशीर असलं तरी विशाखाच्या व्हिडीओतील हावभावाने लक्ष वेधून घेतलं आहे. एका चाहत्याने लिहीलं आहे की, “तुझ्या याच बेमिसाल अदाकारीच्या नादाने बेहोश झालो आहोत खरंच…अप्रतिम खूप खूप छान.” तर दुसऱ्या चाहत्यातीनं लिहीलं आहे की, “ताई खूप छान एक्स्प्रेशन आहेत.” तसेच तिसऱ्या चाहतीनं लिहीलं आहे की, “शब्दचं नाहीत.”

हेही वाचा – Shark Tank India Season 3: शार्क टँकच्या आगामी पर्वात होणार बदल; नव्या परीक्षकाची होणार एन्ट्री, जाणून घ्या

दरम्यान, विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. तिनं या व्यतिरिक्त मालिका आणि चित्रपटात देखील काम केलं आहे. ‘फक्त लढ म्‍हणा’ (२०११), ‘४ इडियट्स’ (२०१२) आणि ‘अरे आवाज कोनाचा’ (२०१३), ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ‘६६ सदाशिव’ (२०१९) अशा काही चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. सध्या ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘शुभविवाह’ मालिकेत रागिणीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vishakha subhedar video goes viral on social media pps