रमेश चौधरी दिग्दर्शित ‘पाणीपुरी’ या चित्रपटामुळे विशाखा सुभेदार सध्या चर्चेत आहे. १५ नोव्हेंबरला विशाखाचा ‘पाणीपुरी’ चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात विशाखाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अशातच आज विशाखाचा मुलगा अभिनय सुभेदारचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री विशाखा सुभेदारने मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने दोन पोस्ट लिहिल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये तिने ‘शुभविवाह’ मालिकेच्या सेटवरील अभिनयचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिलं आहे की, जेव्हा आपण एकत्र ‘शुभविवाह’च्या सेटवर काम करायचो. तेव्हा हा व्हिडीओ मी गुपचूप केला होता…मला वाटलं होतं की कामाच्या ठिकाणी फोनवर होतास तू. नंतर तू मला दाखवलं…प्रॉपर्टी काढत होतास ते…बऱ्याचदा असंच होतं की मला वाटतं की पोरगं टंगळ मंगळ करतंय. पण तू फोकस राहून काम करत होतास.

हेही वाचा – हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल

“तू जेव्हा कामात असतोस तेव्हा १०० टक्के कामात आणि आरामात असतोस तेव्हा १०० टक्के आरामात…हे असं राहणं खूप अवघड असतं खरंतर..पण तुमच्या पिढीला जमत बाई हे असं चिल राहणं आणि तरीही ऑन ऑफ बटण कधी वापरायचं हे देखील तुला माहित आहे…मुळातच खूप बॅलेंस असलेला आहेस तू…असाच राहा…खूप मोठा हो…आणि जे शिकायला परदेशी गेलायस ते सगळं शिक्षण पूर्ण करून, छान अनुभवाने मोठा होऊन ये. देव तुला जे जे हवं ते ते देवो…हेच देवाकडे आईचं मागणं अभिनय सुभेदार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. खूप खूप प्रेम अबुली,” असं पहिल्या पोस्टमध्ये विशाखाने लिहिलं आहे.

हेही वाचा – Miss Universe 2024 : डेनमार्कची विक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’, तर भारताची १८ वर्षांची सौंदर्यवती रिया सिंघा…

त्यानंतर विशाखा सुभेदारने मुलगा परदेशी जातानाचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “हॅप्पी बर्थडे अभिनय सुभेदार…जे जे तुला हवं ते ते ईश्वर तुला देवो…परदेशी तुझं स्वामी रक्षण करोत…दत्त म्हणून नेमका सज्जन माणूस तुझ्या पुढ्यात उभा राहो…आईसाहेब वणीस्थानी राहून तुझ्यावर लक्ष ठेवून आहेतच…आणि या आईकडून तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम.”

हेही वाचा – ‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”

दरम्यान, अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तसंच तिच्या चाहत्यांनी अभिनय सुभेदारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress vishakha subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday pps