अनेक मराठी कलाकार आता हिंदी मालिकांमध्ये काम करत आहेत. ते हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतात. ‘मंगल लक्ष्मी’ ही टीव्हीवरील लोकप्रिय हिंदी मालिका आहे. यातील कलाकारही प्रेक्षकांचे खूप लाडके आहेत. या चित्रपटात सासू आणि सूनेची भूमिका साकारणाऱ्या गायत्री सोहम आणि सानिका अमित या सेटवर चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. दोघीही मराठी आहेत आणि त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन या मालिकेच्या सेटवर पाहायला मिळत आहे.

गायत्री सोहम म्हणते की महाराष्ट्रीय गोष्टींबद्दल असलेल्या दोघींच्या प्रेमामुळे त्यांची सेटवर चांगली मैत्री झाली आहे. इतकंच नाही तर दोघींच्या मैत्रीच्या सेटवरही चर्चा होत असतात. या दोघी एकदा गप्पा मारायला बसल्या की त्यांना थांबवणं जवळजवळ अशक्य असल्याचं सेटवरील क्रू मेंबर्स सांगतात.

“मीच घर चालवते त्यामुळे…”, सई ताम्हणकरने सांगितला घटस्फोटानंतरचा अनुभव; आईबद्दल म्हणाली….

सानिका अमितबद्दल गायत्री सोहम म्हणाली, “आम्ही दोघीही मूळच्या नाशिकच्या आहोत आणि जेव्हा दोन महाराष्ट्रीय लोक एका हिंदी शोमध्ये काम करण्यासाठी एकत्र येतात तेव्हा खूप मजा येते. आम्ही नेहमी मराठीत बोलतो आणि अनेकदा तर क्रू मेंबर्सही आम्हाला कंटाळतात. ऑनस्क्रीन बॉण्ड आमच्या खऱ्या बॉण्डपेक्षा खूप वेगळा आहे. शोमध्ये मी तिला टोमणे मारते आणि माझ्या मुलाला घेऊन जाण्याची धमकी देते, पण खऱ्या आयुष्यात आम्ही एकत्र रील बनवतो आणि एकत्र जेवतो.”

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

पुढे ती म्हणाली, “ऑन-स्क्रीन लक्ष्मी खूप शांत दिसते आणि मला घाबरते कारण मी तिची सासू आहे, पण खऱ्या आयुष्यात आम्ही एकत्र खूप मजा करतो. आम्ही एकत्र नाचत असतो. आम्ही सेटवर इतर कलाकारांनाही मराठी भाषा शिकवतो. ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन दोन्हीमध्ये आमचा खूप वेगळा बॉण्ड आहे, तिच्याबरोबर शूटिंग करणं खूप मजेदार असतं.”

अक्षय कुमारच्या सिनेमामुळे बुडाले पैसे, आता तोच धिरज देशमुखांच्या सासऱ्यांच्या मदतीसाठी आला पुढे; जॅकी भगनानी म्हणाला…

सध्या मालिकेत आदितच्या ऑफिसमधील कूकिंग स्पर्धेत मंगल परिक्षक म्हणून दिसत आहे. मंगलमुळे तणावाचं वातावरण असून सौम्याचा अनपेक्षित अपमान होतो. याच दरम्यान मंगलच्या सासऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने आणखी एक संकट या बहिणींपुढे उभं राहिलं आहे. या कठीण परिस्थिती मंगल सासऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपड करताना दिसते. या मालिकेत मंगलची भूमिका अभिनेत्री दीपिका सिंह साकारत आहे.