अभिनेत्री आदिती सारंगधर ही मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेनंतर ती आता ‘नवे लक्ष’ या कार्यक्रमात पोलिस महिला अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. आदिती तिच्या कामामधून वेळात वेळ काढून सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. आताही तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं आहे.

आणखी वाचा – अवघ्या विशीत दोनवेळा कर्करोगाशी झुंज अन् आता ब्रेन स्ट्रोकचा सामना करतेय प्रसिद्ध अभिनेत्री, रुग्णालयात उपचार सुरु

आदितीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती चक्क कावळ्याशी बोलताना दिसत आहे. घराच्या खिडकीमध्ये आलेल्या कावळ्याला ती खाऊ घालत आहे. पण कावळा काहीच खात नसल्यामुळे आदिती चक्क त्याच्याशी बोलायला सुरुवात करते.

पाहा व्हिडीओ

आदिती म्हणते, “काय काव काव करतोस. एवढी तुला चांगला फ्रेश बनवलेली इडली दिली. तुला इडली नको आहे आणि शाना आहेस तू मोठा. मी दिलेलं खात नाही. पण आरिनने दिलेलं बिस्कीट बरं खातोस. आता तो शाळेत गेला. ओरडत नाही मी तुला प्रेमाने सांगत आहे. काय देऊ तुला? फिश पाहिजे का? हो काय होय.”

आणखी वाचा – Inside Photos : कधीकाळी अगदी लहान घरामध्ये राहणाऱ्या आदेश बांदेकर यांचं आलिशान घर आहे फारच सुंदर, पाहा फोटो

कावळ्याशी हा संवाद आदित साधत आहे. तिचा हा व्हि़डीओ पाहून अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही कमेंट केल्या आहेत. हे फक्त तूच करू शकतेस, धमाल व्हिडीओ असं अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. तिचा हा व्हिडीओ खरंच चेहऱ्यावर हास्य आणणारा आहे.

Story img Loader