सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी त्यांचं जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येनंतर कलाविश्वासह अनेक कलावंताना तसेच संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी काही व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानतंर आता त्यांनी ज्या ठिकाणी गळफास घेतला त्या ठिकाणी दोरीच्या साहाय्यानं एक धनुष्यबाण काढल्याची माहितीही समोर येत आहे.

नितीन देसाई यांच्या निधनानंतर एका कर्मचाऱ्याने एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, “नितीन दादांनी आम्हाला तू सकाळी ८.३० वाजता ये, माझ्या ऑफिसमध्ये एक रेकॉर्डर असेल, त्यात मी जे रेकॉर्ड केलं आहे ते तू चेक कर, असा मेसेज दिला होता. नितीन दादा रात्री २ च्या सुमारास दिल्लीहून मुंबईत आले होते, असं सुरक्षारक्षकांकडून समजत आहे. आम्ही जेव्हा आत गेलो, तेव्हा त्यांच्या सुरक्षारक्षकांना कोणतीही कल्पना नव्हती. आम्ही सुरक्षारक्षकांना विचारलं की दादा कुठे आहेत? आम्ही त्यावेळी सुरक्षारक्षकांना दादा तिथे नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही शोधाशोध केली आणि त्यावेळी दादांना आम्ही गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. ते फार भयानक दृश्य होतं.”
आणखी वाचा : नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी शोकाकुल; गश्मीर महाजनीनेही पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली

A sailor on a fishing boat in Ratnagiri cut off Tandela head and set the boat on fire
रत्नागिरीतील मच्छीमारी बोटीवरील खलाशाने तांडेलाचे डोके कापून बोट दिली पेटवून; देवगड समुद्रात घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
youth was killed by minor due to a dispute over moving a bike
दुचाकी पुढे नेण्याच्या वादातून अल्पवयीनांकडून तरुणाचा खून
NCP Sharad Pawar or NCP Ajit Pawar will fight in Vadgaon Sheri and Hadapsar constituencies in pune
शहरातील ‘या’ मतदारसंघात होणार ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ लढत!
man hit his father on head with an iron rod after arguments in amravati
अमरावती : रागातून उद्भवला वाद; मुलाने लोखंडी बत्त्याने वडिलांच्या डोक्यावर…
Who is Dharmraj Kashyap?
Dharmaraj Kashyap : लॉरेन्स बिश्नोईला आदर्श मानत हल्लेखोर झालेला धर्मराज कश्यप कोण? बाबा सिद्दीकींच्या हत्येआधी काय घडलं?
Mayuresh Wanjale
खडकवासला मतदारसंघातील समीकरणे बदलणार ?
gadchiroli five naxals killed
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला, चकमकीत पाच नक्षल्यांना कंठस्नान

“आम्हाला तो रेकॉर्डर सापडला. आम्ही ती पूर्ण रेकॉर्डिंग ऐकली नाही. तो रेकॉर्डर पोलिसांच्या स्वाधीन केला. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाचे जिथे सेटअप झालं होतं, तिथेच त्यांनी आत्महत्या केली. नितीन दादांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी माझा अंत्यविधी ६ नंबरचा ग्राऊंड आहे, तिथे हॅलिपॅड आहे, त्या ठिकाणी व्हावा, अशी इच्छा सांगितली होती.

नितीन दादांनी ज्या ठिकाणी गळफास घेतला, त्या ठिकाणी एक रस्सी होती, त्या रस्सीला त्यांनी धनुष्यबाणाचा आकार दिला होता आणि बाणाचं टोक ज्या दिशेने होतं, त्या ठिकाणीच त्यांनी आत्महत्या केली. आम्ही पहिल्यांदा जेव्हा तिथे गेलो, तेव्हा आम्ही तो धनुष्यबाण पाहिला. त्यानंतर आम्ही कामगारांना त्यांनी तो धनुष्यबाण बनवला आहे का, याबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्यांनी हे आम्ही बनवलेलं नाही. हे दादांनीच बनवलं असावं, असं ते सांगत आहेत”, असेही तो कर्मचारी म्हणाला.

आणखी वाचा : नितीन देसाईंना हत्तींविषयी होता विशेष आदर, पॅरिसच्या रस्त्यावर एका रात्रीत उभे केलेले २४ फुटांचे १२ हत्ती

दरम्यान नितीन देसाई यांनी ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तर त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते.