आज मराठी भाषा गौरव दिन. प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांची जयंती. त्यानिमित्ताने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने अनेक कलाकार हे सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच प्राजक्ता माळीने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. तिने छान नऊवारी साडी, गळ्यात पारंपारिक दागिने आणि नाकात नथ घातली आहे. याला दिलेल्या कॅप्शनद्वारे तिने तिच्या चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “वैभव तत्त्ववादी माझा…” प्राजक्ता माळीने उघड केले मोठे गुपित

guardian minster mps and mlas remain absence in marathwada liberation day event
मुक्तीसंग्राम कार्यक्रमाला लातूरमध्ये पालकमंत्र्यांपासून खासदार-आमदारांची दांडी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
after facing lots of difficulties two come together and become one forever
वर्धा : तो अनाथ, ती दिव्यांग ! प्रेमाच्या आणाभाका आणि कुटुंबाचा विरोध झुगारून शुभमंगल.
Maratha reservation, Buldhana district,
बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Wolves terrorize villages in Bahraich district of Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात ‘हायब्रीड’ लांडगे बनलेत नरभक्षक! कारणे काय? बळी किती? बंदोबस्त कधी?
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
man attempt suicide by shooting himself due to a love affair
प्रेम प्रकरणातून डोक्यात गोळी झाडून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न – हडपसर भागातील घटना
Badlapur, sexual abuse, political exploitation, protest, banners, internet shutdown, ‘Mychildnotforpolitics’, rail roko, lathi charge, local response, badlpur school case
चिमुकल्यांच्या अत्याचाराचे ” विकृत राजकारण नको”, बदलापुरात ठिकठिकाणी झळकले फलक

प्राजक्ता माळीची पोस्ट

“प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं..
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…

कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहीलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या “मराठीवर”…

जे आहे आज, राहील उद्या , परवा..मरणोत्तरही…..

“मराठी भाषा गौरव दिनाच्या”; महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा…”, असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.

आणखी वाचा : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत

दरम्यान प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.