सध्या टेलिव्हिजनचा जगतात एकच चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस या कार्यक्रमाची, योगायोग म्हणजे हिंदी आणि मराठी भाषेत एकाचवेळी हे पर्व सुरु होत आहे. आज रविवार २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले आहे. याचा ग्रँड प्रीमियर कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. यंदाच्या पर्वात अक्षय केळकर, समृद्धी जाधव, किरण माने, अमृता धोंगडे असे अनेक कलाकार दिसणार आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अपूर्वा नेमळेकर दिसणार आहे. मालिकेत तिने आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ केले होते. बिग बॉसमध्ये ती कोणाला घायाळ करणार का हे कळलेच.
अपूर्वा नेमळेकरने आपल्या नृत्यातून या सोहळयात एंट्री घेतली. महेश मांजरेकर यांनी तिचे स्वागत केले. महेश मांजेरकरांना तिला प्रश्न विचारला, ‘कस वाटतंय’? अपूर्वाने यावर उत्तर दिले खूप ‘छान वाटतंय मी हा खेळ जिंकण्यासाठी आले आहे’. महेश मांजरेकरांनी तिला विचारले ‘तू जिंकण्यासाठी काही ठरवले आहेस का’? त्यावर अपूर्वाने उत्तर दिले, ‘मन मनगट आणि मेंदू यांच्या जोरावर मी हा खेळ जिंकणार आहे’. प्रेक्षकांनी तिच्या या वाक्यावर टाळया वाजवल्या. महेश मांजरेकरांनी तिला विचारले की ‘बिग बिग बॉसच्या घरात तुला कोणाला घेऊन जायला आवडेल’? त्यावर अपूर्वाने उत्तर दिले की ‘माझे मित्र मैत्रीण कमी आहेत त्यामुळे घरात कोणाला न्यायचे झाले तर मी माझ्या आईला घेऊन जाईन. तीच माझी मैत्रीण आहे. मी या स्पर्धेत भाग घेणार हे तिला मान्य नव्हते कारण तिचे काही विचार होते’. अपूर्वाने पूढे सांगितले की ‘मी आईच्या खूप जवळ आहे. आज माझे बाबा हवे होते. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या’.
दरम्यान बिग बॉस मध्ये विविध क्षेत्रातील १६ कलाकार सहभागी होणार आहेत. ‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत ‘शेवंता’ ही भूमिका सकारात तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. मध्यन्तरी तिने एक मालिका निर्मात्यांशी मतभेद झाल्यामुळे सोडली होती. त्यानंतर काही मालिकांमध्ये तिने काम केले. सोशल मीडियावर ती सक्रिय असते.