टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉसचं १६ पर्व आता संपलं आहे. रविवारी रात्री या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि यात पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. अखेरीस शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत होती. पण त्यात शिव ठाकरेला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. शिव ठाकरेंचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच समर्थन करणारे त्याचे चाहते आहेतच त्याचप्रमाणे मराठी कलाकारदेखील त्याच्या पाठीशी आहेत. शिव ठाकरेसाठी माजी बिग बॉस स्पर्धकाने पोस्ट शेअर केली आहे.

बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर शिव ठाकरे आता बिग बॉस १६चं विजेतेपद जिंकेल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. मात्र असं झालं नाही. बिग बॉस मराठीमधला स्पर्धक आणि अभिनेता अभिजित केळकरने शिव ठाकरेसाठी पोस्ट शेअर केली आहे. शिव ठाकरेबरोबरचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन दिला आहे “मला तुझा अभिमान आहे भावा, तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी आनंदी आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

Bigg Boss 18 Advocate Gunratan Sadavarte told his love story
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली त्यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’, जोरजोरात ओरडत म्हणाले, “जयश्री आय लव्ह यू”
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
bigg boss marathi 5 winner suraj chavan visit jejuri temple
सूरजने ‘ते’ शब्द खरे ठरवले! Bigg Boss ची ट्रॉफी घेऊन आधी गेला जेजुरीला, नंतर बारामतीत जंगी स्वागत, पाहा व्हिडीओ
Suraj Chavan
“ती आज आली असती तर…”, ट्रॉफी जिंकल्यावर सूरज चव्हाणला आली आईची आठवण; भावुक होत म्हणाला…
pandharinath kamble heartfelt post for winner suraj chavan
पॅडी दादांच्या हातात ट्रॉफी दिली, मिठी मारली अन्…; सूरज-पंढरीनाथचे ‘ते’ फोटो पाहून नेटकरी भावुक, म्हणाले, “दोन खरी माणसं…”
bigg boss marathi pushkar jog shares post for abhijeet sawant
“शांत, सज्जनतेने वागणारे स्पर्धक उपविजेते…”, सूरजने ट्रॉफी जिंकल्यावर पुष्कर जोगची पोस्ट, अभिजीतबद्दल म्हणाला…
Pune Fc road viral video punekar and netizen support big boss suraj chavan want him to be winner showing poster on car
VIDEO: पुणेकरांनी बिग बॉसचा विजेता ठरवला! कारवर लावलं असं पोस्टर की पाहून सगळेच थांबू लागले; पाहा कोण होणार विजेता
shiv thakare predict winner of this season says suraj due to votes
“प्रेक्षकांच्या मतांमुळे सूरज जिंकेल पण, गेमचा विचार केला तर…”, Bigg Boss च्या विजेत्याबद्दल शिव ठाकरेचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

“मी हरत नसतो तर समोरच्याला…” मराठी ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकराचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अभिनेता अभिजीत केळकर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नेहमीच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना आणि आपल्या कामाचे अपडेट देताना दिसतो. बिग बॉस सोहळा होण्याआधीदेखील त्याने शिवसाठी पोस्ट शेअर केली होती.

शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाचा विजेता ठरला नसला तरी त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. शिव ठाकरे ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार मानला गेला होता. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसाठी शिव व प्रियंका चौधरी यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, एमसी स्टॅनने सर्वाधिक वोट मिळवत बाजी मारली आणि ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं.