टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉसचं १६ पर्व आता संपलं आहे. रविवारी रात्री या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि यात पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. अखेरीस शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत होती. पण त्यात शिव ठाकरेला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. शिव ठाकरेंचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच समर्थन करणारे त्याचे चाहते आहेतच त्याचप्रमाणे मराठी कलाकारदेखील त्याच्या पाठीशी आहेत. शिव ठाकरेसाठी माजी बिग बॉस स्पर्धकाने पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर शिव ठाकरे आता बिग बॉस १६चं विजेतेपद जिंकेल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. मात्र असं झालं नाही. बिग बॉस मराठीमधला स्पर्धक आणि अभिनेता अभिजित केळकरने शिव ठाकरेसाठी पोस्ट शेअर केली आहे. शिव ठाकरेबरोबरचा फोटो शेअर करत त्याने कॅप्शन दिला आहे “मला तुझा अभिमान आहे भावा, तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी आनंदी आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

“मी हरत नसतो तर समोरच्याला…” मराठी ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकराचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अभिनेता अभिजीत केळकर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. नेहमीच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना आणि आपल्या कामाचे अपडेट देताना दिसतो. बिग बॉस सोहळा होण्याआधीदेखील त्याने शिवसाठी पोस्ट शेअर केली होती.

शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाचा विजेता ठरला नसला तरी त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. शिव ठाकरे ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीचा प्रबळ दावेदार मानला गेला होता. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसाठी शिव व प्रियंका चौधरी यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, एमसी स्टॅनने सर्वाधिक वोट मिळवत बाजी मारली आणि ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi big boss contestant abhijit kelkar shared post for shiv thackeray spg
Show comments