Marathi Celebrities : गणेशोत्सवानिमित्त गेले दहा दिवस संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण पाहायल मिळालं होतं. आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली असून, सर्वत्र भव्य विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. अशातच सोमवारी सायंकाळी मराठी कलाविश्वातील बहुतांश कलाकार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. मनोरंजन विश्वातील अनेक मराठी कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतलं. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकप्रिय मराठी अभिनेत्री व निर्माती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्मिष्ठा राऊतने मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाच्या आरतीची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तसेच कलाकार ( Marathi Celebrities ) बाप्पाची आरती म्हणण्यात दंग झाले असल्याचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “मी कोणत्याही टीमचा…”, धनंजयने गेमच बदलला! निक्कीसमोर मांडलं स्पष्ट मत; काय आहे नवीन Strategy?

मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचले मराठी कलाकार

गौरव मोरे, वैभव तत्त्ववादी, सुरेश वाडकर, प्रवीण तरडे व त्यांच्या पत्नी स्नेहल, आदिनाथ कोठारे, अभिजीत खांडकेकर व सुखदा, प्राजक्ता माळी, अक्षया देवधर व हार्दिक जोशी, मंगेश देसाई, स्वप्नील जोशी, सुशांत शेलार, शिवानी रांगोळे, संतोष जुवेकर, हेमांगी कवी, क्षितीश दाते, हृषिकेश जोशी, प्रथमेश परब व क्षितीजा, रुचिरा जाधव अशा अनेक कलाकारांनी ( Marathi Celebrities ) सोमवारी वर्षा निवासस्थानी भेट देऊन बाप्पाचं दर्शन केलं.

मराठी कलाकरांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी हजेरी लावत बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. शिल्पा शेट्टी, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल, मृणाल ठाकूर, दिशा पाटनी, उदित नारायण, रणबीर कपूर, आर माधवन सलमान खान यांसह इतर काही बॉलीवूड कलाकारांचा यात समावेश आहे.

हेही वाचा : Video : कोकणातील संस्कृती, बाप्पाला गाऱ्हाणं अन्…; ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दाखवली गावच्या विसर्जनाची झलक

हेही वाचा : “मला पहाटे नारळाच्या झाडावर चढायला लावलं, घरी जेवायला बोलावलं अन् सोडून निघून गेला…”; विवेक ओबेरॉयचा अभिनेत्याबाबत खुलासा

शर्मिष्ठा राऊतने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकारांनी ( Marathi Celebrities ) वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन घेत मनोभावे आरती केल्याचं पाहायला मिळालं. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi celebrities visit cm eknath shinde varsha bungalow for ganpati bappa darshan and aarti video viral sva 00