मराठी बालकलाकार साईशा भोईरची आई पूजा भोईर हिला मे २०२३ मध्ये आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सुनावणीत तिची कोठडी ७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट आली आहे. पोलीस साईशाचे आई-वडील पूजा भोईर आणि विशांत भोईर यांची मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत आहेत.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, साईशाच्या आईच्या डिमॅट खात्यात ३ कोटी ३३ लाख रुपये सापडले आहेत. याशिवाय तिच्याकडे २७ लाखांचे सोन्याचे दागिने आणि मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे. तसेच कार, बँक खाती आणि साईशाच्या खात्यांशी संबंधित बचतीचे पैसे यासह इतर मालमत्तांचा शोध सुरू असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. विशांत व पूजाने साईशाबरोबर केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय ट्रिपचीही पोलीस चौकशी करणार आहेत.
पूजाने लोकांची ३ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं कळतंय. लवकरच आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी तपास हाती घेणार आहे. दुसरीकडे, नाशिकमधील काही जणांनी पूजाचा पती विशांत भोईरविरोधात लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. सध्या विशांत फरार असून लवकरच साईशाची तिच्या मालिकेच्या सेटवर चौकशी केली जाईल.
“असे सीन करताना…”, कुमुद मिश्रांनी सांगितला काजोलबरोबर बोल्ड सीन करण्याचा अनुभव
दरम्यान, शोच्या निर्मात्यांनी ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या वृत्तानुसार, साईशा लहान असल्यामुळे त्यांच्या शोमध्ये काम करत राहील. कारण तिच्या कुटुंबात काय घडत आहे हे समजण्यासाठी तू खूप लहान आहे. ‘चला हवा येऊ द्या’ची संपूर्ण टीम सध्या सेटवर तिच्या आई-वडिलांबद्दल बोलणं टाळत आहे.