आपल्या गोड आवाजाने कानांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणून आर्या आंबेकरला ओळखले जाते. तिच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. मात्र नुकतंच आर्या आंबेकरने एका घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आर्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत नवीन स्कॅम समोर आणला आहे.
आर्याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आर्या ही जाहीरपणे संताप व्यक्त करताना दिसत आहे. मी अनेक गाण्यांचे कार्यक्रम करत असते. काही युट्यूब चॅनल माझ्या परवानगीशिवाय त्या गाण्याच्या कार्यक्रमातील व्हिडीओचा वापर करतात. काहींनी तिच्या गाण्याचे ऑडिओ वापरले आहेत. मात्र तिला याविरोधात कुठलीही तक्रार करता येत नाही. कारण तिने तिच्या आवाजात गायलेले अभंग तिच्याकडे उपलब्धच नाहीत. त्यामुळे तिला कॉपीराईट क्लेम करता येत नाही, अशी तक्रार तिने या व्हिडीओत केली आहे.
आणखी वाचा : आर्या आंबेकरला झाला घशाचा संसर्ग, स्वत: दिली माहिती, म्हणाली “मी माझे…”
आर्या आंबेकरची पोस्ट
“New scam in the market..beware musicians..
मी माझ्या live concerts मध्ये गायलेल्या काही गाण्यांचे videos काही लोकांनी YouTube वर पोस्ट केले होते. त्या videos मधून audios extract करून “latest Marathi Kirtan” नावाच्या एका music label ने audio platforms वर स्वतःच्या copyright सकट upload केले.!
हे audios (videos देखिल!) माझ्या परवानगी शिवाय upload झालेले आहेत. पण त्यावर claim करता येण्यासाठी original व्हिडिओ किंवा ऑडियो माझा स्वतःचा असायला हवा. तो नसल्यामुळे, माझा आवाज माझ्या परवानगी शिवाय वापरला असूनही मला claim करता येत नाहीये! How sad can this get!”, असे आर्या आंबेकरने म्हटले आहे.
आणखी वाचा : “मुग्धा-प्रथमेशचंही ठरलं, तू कधी लग्न करणार?” अखेर आर्या आंबेकरने सोडलं मौन, म्हणाली…
दरम्यान आर्या आंबेकरच्या या व्हिडीओनंतर संबंधित गाण्याच्या अॅपने ही सर्व गाणी हटवली आहे. तिने स्वत: या पोस्टखाली कमेंट करत याबद्दलची माहिती दिली आहे. “ही गाणी डिलीट करण्यात आली आहे”, असे तिने या पोस्टखाली कमेंट करत सांगितले आहे.