सध्या सोशल मीडियावर एक मराठमोळं कपल नेहमी चर्चेचा विषय असतं, ते म्हणजे नारकर कपल. ९०च्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील हे लोकप्रिय नारकर कपल अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नवनवीन व्हिडीओ व फोटो शेअर करत असतात. अनेकदा दोघं ट्रोल झाले आहेत. पण याला दोघं सडेतोड उत्तर देऊन ट्रोलर्सची तोंडं बंद करतात. अशातच त्यांचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – कंगना रणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; श्रीरामाशी तुलना करत म्हणाली…
मागील काही दिवसांपसून ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे. याच गाण्याचं नवीन व्हर्जन अविनाश व ऐश्वर्या नारकर यांनी केलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’ हा सोहळा आज पाहायला मिळणार आहे. त्याचनिमित्तानं अविनाश व ऐश्वर्या नारकर यांनी ‘आमच्या झीनं गणपती आणला’ हा व्हिडीओ केला आहे. ‘मराठी मनोरंजन विश्व’ या इन्स्टाग्राम पेजवर त्यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा – सुबोध भावेमुळे चिन्मय मांडलेकर सात महिने घरी का बसला होता? नेमकं काय घडलं होतं? वाचा
या व्हिडीओमुळे नारकर कपल आता पुन्हा एकचा चर्चेत आलं आहे. बऱ्याच नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खटकला आहे. एका नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘किती गुणी अभिनेते होते हे अविनाश नारकर…आता यांना काय झालं?…अशी प्रसिध्दी चांगली नाही…आपण आधीच प्रसिद्ध आहात…हे वेडे चाळे करण्याची काहीच गरज नाही… ‘ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘हा व्हिडीओ करताना लाज वाटली पाहिजे…’ तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘आता हे बंद करा.’
हेही वाचा – ‘जवान’ फेम संगीतकार अनिरुद्ध रविचंदर लवकरच ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर करणार लग्न? चर्चांना उधाण
दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश नारकर सध्या ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. तसेच ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. शिवाय त्या ‘स्टार प्लस’वरील हिंदी मालिका ‘बातें कुछ अनकही सी’मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत.